ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जैन संघटनेची राष्ट्रिय संवाद यात्रा धडकणार शुक्रवारी अकोल्यामध्ये

(राष्ट्रीय अध्यक्ष, व राज्याध्यक्षांच्या संपूर्ण टीमचा असणार सहभाग)

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची चमू ही पश्चिम विदर्भाच्या अकोला शहरात दिनांक 20 मार्च 26 रोजी पोहोचणार असून भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या समवेत ते संवाद साधणार आहेत तर BJS च्या वतीने संपूर्ण भारतात व महाराष्ट्र राज्यात जी सामाजिक कामे सुरू आहेत त्याबाबत सखोल मार्गदर्शन राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साखला व राज्य अध्यक्ष केतनभाई शहा हे करणार आहेत अकोला येथे आयोजित या संवाद यात्रेस भारतीय संघटनेच्या अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी व चाप्टर अध्यक्ष सचिव व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे विदर्भाध्यक्ष कीर्ती कुमार वायकोस अकोल्याचे प्रा. सुभाष जी गादीया व राज्य कार्यकारीनी सदस्य सन्मती जैन यांनी एका प्रसिध्दी पत्रका द्वारे केली आहे.

 याबाबत सविस्तर असे की भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी सकल जैन समाजा सोबतच इतर समाजासाठी भरीव कार्य केलेले आहे त्यांच्या दिशा निर्देशानुसार राष्ट्रीय स्तरावर व राज्यस्तरावर संघटनेचे पदाधिकारी वेळोवेळी समाजाभिमुख काम करताना दिसत आहे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला ,राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा, राज्य अध्यक्ष केतनभाई शहा, महासचिव प्रवीण पारख यांनी *राष्ट्रीय संवाद यात्रेस प्रारंभ केला असून ही संवाद यात्रा दिनांक 20 मार्च 26 रोजी अकोला शहरात सकाळी दाखल होणार आहे ओस्तवाल भवन मध्ये आयोजित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात संघटनेच्या वतीने सुरु केलेल्या कार्याची माहिती देण्यात येणार आहे यामध्ये प्रामुख्याने जैन पारिवारिक अदालत

 युवती सक्षमीकरण

गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार

फाउंडेशन प्रोग्राम

 मुल्यवर्धन शिक्षण सोबतच उच्चशिक्षित युवा व युतीसाठी परिसंवादासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे

 यावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे या संवाद यात्रेत सहभागी होण्यासाठी अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व चाप्टर अध्यक्ष व त्यांच्या टीमने सहभाग घेण्याचे आवाहन प्रा. सुभाष गादीया अकोला ,विदर्भ अध्यक्ष किर्तिकुमार वायकोस चिखली, व राज्य कार्यकारणी सदस्य सन्मती जैन यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये