ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय औ. प्र. संस्थेत कौशल्य दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न : ६३ गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

        ऋषी अगस्त्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अ. भा. व्यवसाय परीक्षा ऑगस्ट २०२६ मध्ये उत्कृष्ट गुणांकनासह उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव पाचव्या कौशल्य दीक्षांत६३ समारंभात करण्यात आला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य श्री. गजानन राजूरकर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन एस एन डी टी महिला विद्यापीठ बल्लारपूर कॅम्पस चे संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता ॲड. डॉ. कल्याण कुमार उपस्थित होते. संस्थेचे गटनिदेशक बंडोपंत बोढेकर, महेश नाडमवार, अनिल बोढाले यांची उपस्थिती होती. आजच्या काळात कौशल्य आधारित शिक्षणास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पण त्याबरोबरच आपले शिकणे कधीही थांबवू नका, स्वतःला अपडेट करा, असा मौलिक संदेश डॉ. इंगोले यांनी यावेळी दिला. बदलत्या काळानुसार नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे , स्पर्धात्मक क्षमता वाढवणे गरजेचे असून वाढत्या स्पर्धेत आपले स्थान निर्माण करण्याविषयी डॉ . कल्याणकुमार यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.

या कार्यक्रमात विविध व्यवसायांच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या ६३ गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक आणि संबंधित व्यवसायांचे निदेशक उपस्थित होते. कार्यक्रमाध्यक्ष प्राचार्य गजानन राजूरकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील व्यावसायिक कौशल्यपूर्ण जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात.‌ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटनिदेशक बंडोपंत बोढेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पियुष केने व सौ. अनिता ढेंगेकर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा गौरव, पालकांच्या योगदानाचा सन्मान आणि बदलत्या रोजगारविश्वासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणारा हा कौशल्य दीक्षांत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये