देव दिवाळी दिनविशेष : कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरी पौर्णिमा : देवदिवाळीचा आनंदोत्सव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्धबांधव अष्टशीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक- उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेत धम्मोपदेश श्रवण करतात. शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शीख धर्माचे संस्थापक श्रीगुरू नानकदेव यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते.
पौराणिक पार्श्वभूमी:
त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला. या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे वससून त्याला अभेद्य तट केला होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते, तसेच नदीत “दीपदान” करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिवपूजन केले जाते. या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्यावतार घेतला, अशीही धारणा आहे.
ब्रह्मनिष्ठ आत्मज्ञानी प.पु. बाळूमामा महाराज पुण्यतिथी सोहळा, श्री सत्य अविनाश पारख पद समाज जावली- वारूळ ता. शाहूवाडी जि कोल्हापूर येथेही सोहळ्याचे आयोजन असते.
त्रिपुरवाती लावून शिव उपासना- दीपोत्सव:
या विशेष दिवशी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ भाविक देवाला अर्पण करतात. याला “अन्नकोट” असे म्हटले जाते. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. हे या दिवसाचे वैशिष्ट्य सांगता येते. मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात. भाविक भगवान शंकरापुढे त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करतात.
कार्तिक पौर्णिमा, ज्याला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा देव दिवाळी असेही म्हणतात. हा कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील १५ व्या तिथीला साजरा होणारा महत्त्वाचा सण आहे. यंदा सन २०२६ मध्ये कार्तिक पौर्णिमा मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी आहे.
धार्मिक आणि पौराणिक महत्त्व, त्रिपुरारी पौर्णिमा:
भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला, त्या विजयाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो.
देव दिवाळी: या दिवशी देवांची दिवाळी साजरी केली जाते. अनेक ठिकाणी मंदिरे, घरे, अंगण आणि नदीघाटां
वर दिव्यांची आरास केली जाते.
कार्तिक स्वामी व विष्णू-लक्ष्मी पूजन:
काही परंपरांनुसार या दिवशी भगवान शिव, विष्णू आणि लक्ष्मीचे पूजन केले जाते.
बौद्ध धम्मातील महत्त्व: कार्तिक पौर्णिमेला तथागत बुद्धांचे पट्टशिष्य सारिपुत्र यांचे परिनिर्वाण झाले होते. या दिवशी उपोसथ व्रत, अष्टशीलांचे पालन आणि बुद्ध वंदना केली जाते.
प्रमुख विधी आणि परंपरा, स्नान व दान:
पवित्र नदी किंवा जलाशयात स्नान करणे आणि गरजूंना अन्न, धान्य, कपडे किंवा उबदार वस्तूंचे दान करणे पुण्यप्रद मानले जाते.
दीपदान: संध्याकाळी प्रदोष काळात घरात, मंदिरात किंवा नदी-तलावाकाठी दिवे लावले जातात. शिवमंदिरांमध्ये ३६५ वातींचा दिवा लावण्याचीही प्रथा आहे.
पूजा: शिवलिंगावर जलाभिषेक, पंचामृत अभिषेक, बेलपत्र अर्पण करणे आणि रात्री चंद्राचे दर्शन घेऊन अर्घ्य देण्याची परंपरा आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेची मुख्य कथा:
भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केल्याशी संबंधित आहे.
वरदान आणि तीन नगरी:
तारकासुराचा वध कार्तिकेयाने केल्यानंतर त्याच्या तीन मुलांनी- तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली यांनी ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेवांकडून त्यांनी असे वरदान मागितले की त्यांना तीन वेगवेगळी- सोने, चांदी आणि लोखंडाची फिरती शहरे मिळावीत, जी हजार वर्षांतून एकदाच एका रेषेत येतील आणि तेव्हाच एकाच बाणाने त्यांचा नाश होऊ शकेल.
देवांवर संकट: या तिन्ही असुरांना एकत्रितपणे त्रिपुरासुर म्हटले जाऊ लागले. अमरत्वाचे वरदान मिळाल्याच्या गर्वाने त्यांनी तिन्ही लोकांत हाहाकार माजवला आणि देवांना स्वर्गातून हाकलून लावले.
भगवान शंकरांचा अवतार (त्रिपुरारी):
सर्व देव मदतीसाठी भगवान शंकरांकडे गेले. हजार वर्षे पूर्ण झाल्यावर जेव्हा ती तिन्ही नगरे एका सरळ रेषेत आली, तेव्हा शंकरांनी पृथ्वीचा रथ, सूर्य-चंद्राची चाके, मेरू पर्वताचे धनुष्य, वासुकी नागाची प्रत्यंचा आणि भगवान विष्णूंचा बाण बनवून एकाच बाणाने तिन्ही नगरे भस्म केले.
देव दिवाळीचा आनंद: त्रिपुरासुराचा वध कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी झाला. या विजयाच्या आनंदात सर्व देवांनी काशी नगरीत एकत्र येऊन दिवे लावून उत्सव साजरा केला, म्हणून या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा आणि देव दिवाळी म्हणतात.



