ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पद्मशाली समाज संघटनेच्या चंद्रपूर जिल्ह्य अध्यक्षपदी डॉ. बंडु आकनुरवार

पहिल्या व दुसर्‍यांदा बिनविरोध निवड : समाज कार्य, संघटन कौशल्याचा गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           चंद्रपूर जिल्हा पद्मशाली समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ.बंडुआकनुरवार यांची दुसर्यादा बिनविरोध निवड झाल्याबद्दल समाजबांधवांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. पहिल्यांदा बिनविरोध निवड आणि आता दुसर्यादाही त्याच विश्वासाने बिनविरोध निवड होणे, हा केबळ योगायोग नसून त्यांच्या कार्यावर समाजाने दाखवलेला अढळ विश्वास असल्याची भावना व्यक्त होत आहे.समाजासाठी सातत्याने कार्यरत राहणे, प्रत्येकाला सोबत घेऊन चालणे, माणसे जोडण्याची हातोटी आणि संघटनेला बळकटी देण्यासाठी केलेले प्रयत्न ही डॉ.बंडुआकनुरवार यांची खरी ताकद मानली जाते. त्यांच्या नेतृत्वावर समाजाने पुन्हा विश्वास व्यक्त केल्याने संघटनात्मक एकजूट आणि नेतृत्वाला मिळणारी मान्यता अधोरेखित झाली आहे.

दुसन्यांदा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी बिनविरोध मिळणे ही त्यांच्या कार्याची पावती असून, आगामी काळात समाजाच्या प्रगतीस आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वात नवे उपक्रम राबविले जातील,अशी अपेक्षा समाजबांधवांकडू व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये