संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसच्या वोट रक्षकांनी तैनात असावे – जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे
चंद्रपूर जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न ; वोट रक्षक अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राजुरा :_ ज्या प्रमाणे देशाचे रक्षण हे तटरक्षक दल करते त्या प्रमाणे आता काँग्रेसच्या वोट रक्षकांना भारतीय लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी सजग राहुन, कर्तव्यदक्षतेने तैनात राहून मत चोरांचे सर्व मनसुबे हाणून आपली भुमिका पार पाडावयाची आहे. लोकशाही व्यवस्थेचे बळ संविधानात असून प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नावांची प्रत्यक्ष पडताळणी करून कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही, यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सजग प्रहरी म्हणून काम करावे असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी केले.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार संविधान रक्षा मार्च आणि वोट रक्षक अभियान च्या नियोजनासाठी चंद्रपूर जिल्हातील काँग्रेसचे विधानसभा प्रभारी, बिएलए – १, ब्लाक अध्यक्ष यांची आढावा बैठक सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्यांनी अभियानाची उद्दिष्टे, संघटनात्मक जबाबदाऱ्या, बूथनिहाय नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी याबाबत विशेष मार्गदर्शन केले.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी वोट रक्षक अभियानाचे सविस्तर प्रेझेंटेशन सादर करून ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी, प्रत्येक मतदान केंद्रासाठी वोट रक्षकांची नियुक्ती, त्यांना प्रशिक्षण, मतदार यादीतून वगळलेल्या नावांची प्रत्यक्ष पडताळणी, नागरिकांचे निवेदन संकलन आणि दैनंदिन अहवाल सादर करण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. तसेच या कामावर ब्लाक अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, सर्कल अध्यक्ष दररोज देखरेख ठेवतील असे सांगितले.
प्रत्येक मतदान केंद्रावर किमान एक प्रशिक्षित वोट रक्षक नियुक्त करन २२ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच दि. २६ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे आयोजित संविधान रक्षा मार्चमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे आणि अभियानाच्या माध्यमातून संविधान, लोकशाही व मतदानाच्या अधिकाराबाबत जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेसचे राजुरा विधानसभा प्रभारी हैदर अली दोसानी, बल्लारपूर विधानसभा प्रभारी अँड. नंदाताई पराते, चिमूर विधानसभा प्रभारी संदेश शिंगलकर, वरोरा विधानसभा प्रभारी हनुमंत मडावी, जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रय, प्रदेश पदाधिकारी संतोष रावत, रोशनलाल बिट्टु, प्रेरणा गौर, काँग्रेसचे बिएलए – 1 डॉ. विजय घरत, नगराध्यक्ष अरुण धोटे, खेमराज तिडके, प्रवीण काकडे, राहुल घोटेकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन कत्याल, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष सफाक शेख, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा कुंदाताई जेनेकर, प्रमोद बोरीकर, दिनेश चोखारे, राजु रेड्डी, प्रवीण पडवेकर, अहेतेश्याम अली, विनोद अहिरकर, गुरूदास चौधरी काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद बोरीकर यांनी केले. संचालन रामकृष्ण कोंडरा यांनी तर आभार प्रदर्शन सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन कत्याल यांनी केले.



