ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अट्टल दुचाकी चोरास अटक, चोरीचा गुन्हा उघड

पो.स्टे. वर्धा शहर गुन्हे पथकाची कामगीरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 नमुद घटना ता. वेळी व स्थळी यातील फिर्यादी नामे सुरेंद्र रामचंद्र महाकाळकर वय 51 वर्ष धंदा-ईमारत बांधकाम रा. गोपुरी चौक, नागपुर रोड वर्धा यांनी त्यांचे मालकीची सुजुकी कंपनीची बर्गमॅन ग्रे रंगाची मोपेड क्रमांक एम.एच.32 ए.क्यु. 9970 ही दिनांक 12/03/2026 चे सायंकाळी 04/00 वाजता मोपेड गाडी घेऊन मार्केट मधुन घरी आले व घरा समोर मोपेड गाडी लॉक करुन स्वताची कार घेऊन बांधकामाचे साईडवर सावंगी येथे गेले व घरचे लोक नागपुर येथे गेल्याने घरी कोणी नव्हते. फिर्यादी परत सायंकाळी 06/00 घरी परत आले. फिर्यादीचे घरा समोर ठेवलेली मोपेड गाडी दिसुन न आल्याने त्यानी घराचे सी.सी.टि.व्ही. कॅमेरेची फुटेज बघीतले असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो स्टे. वर्धा शहर येथे अप.क्र.299/26 कलम 303(2) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला

सदर गुन्हा तपासावर असतांना मुखबीर कडुन खात्रीशिर मिळालेल्या माहिती वरून दिनांक 17/03/2026 रोजी अज्ञात ईसम ग्रे रंगाची बर्गमॅन मोपेड विना नंबरची घेऊन फिरत आहे अशा खबरेवरुन आम्ही पो. स्टॉप विसावा चौक, ईतवारा येथे जाऊन सदर ईसमास पंचासमक्ष थांबवुन नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव अनुराग प्रविण धाबर्डे वय 20 वर्ष रा.तळोदी (कुटकी) ता. सेलु जि. वर्धा यास मोपेड गाडी बाबच विचारपुस केल्याने त्याने ऊडवाऊडवीचे उत्तर दिल्याने त्याचे ताब्यातील बिना नंबरची सुजुकी बर्गमॅन जिचा चेचीस क्र. MB8EA11DHL8131824 असलेली सखोल विचारपुस केल्यावर त्याने सांगीतले की दि. 12/03/2026 रोजी गोपुरी चौक नागपुर रोड येथेन चोरुन नेली व गाडीची नंबर प्लेट काढुन स्वता चालवित होतो दोन पंचासमक्ष त्याचे ताब्यातुन एक सुजुकी कंपनीची बर्गमॅन ग्रे रंगाची मोपेड विना नंबरची किंमत 45,000/-रू जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. सौरभ अग्रवाल साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. सदाशिव वाधमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर साहेब, तसेच पोलीस स्टेशन वर्धा शहर चे प्रभारी ठाणेदार श्री. भुसारी साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद रासकर यांचे निर्देशनुसार पोलीस ठाणे वर्धा शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शरद गायकवाड साहेब पोलीस हवालदार महेंद्र पाटील ब.क.523, पोलीस हवालदार अभिजित वाघमारे ब.क्र. 1416, पोलीस अंमलदार रंजित भुरसे ब.क्र. 1717, पोलीस अंमलदार अमोल साळवन ब.क.970 यांनी केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये