ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जवाहर नवोदय प्रवेशासाठी तीन विद्यार्थ्यांची निवड

विश्वशांती विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी विश्वशांती विद्यालयाचे…

शैक्षणिक सत्र २०२५ -२६ मध्ये नवोदय विद्यालय समितीद्वारे दिनांक १३ डिसेंबर २०२६ ला जवाहर नवोदय प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात आली सदर परीक्षेमध्ये भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीद्वारा संचालित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक प्राप्त तालुक्यातील नामांकित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावलीचे तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात कु. गार्गी नितेश रसे, समीर चरनदास मांदाडे आणि तेजल योगेश वाढई या तीन विद्यार्थ्यांनी परीक्षेत सुयश प्राप्त करून तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी पास होण्याचा बहुमान मिळविला. मागील शैक्षणिक सत्रात विश्वशांती विद्यालयाचे दोन विद्यार्थी यश प्राप्त केले होते. याही वर्षी तीन विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवलेली आहे.उत्तीर्ण झालेल्या तीनही विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई – वडील,भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीपभाऊ गड्डमवार,सचिव राजाबाळ पा.संगीडवार,शाळा समितीचे अध्यक्ष अनिलभाऊ स्वामी तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी,विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार, पर्यवेक्षक राजेश झोडे,विषय शिक्षक किशोर संगीडवार,अरुण सातपुते, सहाय्यक शिक्षिका वनिता गेडाम तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले. विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

    दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या विद्यालयातील तीन विद्यार्थी नवोदय प्रवेश पात्रता परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत सत्राच्या अगदी सुरुवातीपासून विद्यालयात नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचे नियमितपणे वर्ग सुरू असतात त्याचे फलित म्हणून हे यश प्राप्त झाले. विद्यार्थ्यांची जिद्द,चिकाटी आणि आमचे मार्गदर्शन यामुळेच विद्यालयाची ही यशाची परंपरा कायम दिसून येत आहे आणि पुढील सत्रात सुद्धा ही यशाची परंपरा कायम राहील.

 रवींद्र मुप्पावार, मुख्याध्यापक 

विश्वशांती विद्यालय सावली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये