ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बॅडमिंटन खेळताना अपघात

१६ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    आयुध निर्माणी वसाहतीत एक हृदयद्रावक अपघात घडून १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अणुष्का अजय यादव (वय १६) ही इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेत होती. ती आयुध निर्माणी वसाहतीत आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास होती. मंगळवारी सायंकाळी आपल्या क्वार्टरसमोरील मोकळ्या मैदानावर ती मैत्रिणींसोबत बॅडमिंटन खेळत होती.

दरम्यान, खेळताना तोल जाऊन ती मुख्य रस्त्यावर डोक्याच्या भारावर जोरात पडली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तातडीने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेमुळे आयुध निर्माणी वसाहतीत शोककळा पसरली असून, नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी संबंधित परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये