शिवसेना पक्ष निरीक्षक अभिजीत अडसूळ यांनी घेतला देऊळगाव राजा शहर शाखेचा आढावा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असून सर्वच राजकीय पक्षाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे शिवसेनेचे माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्यावर शिवसेनेने अमरावती व बुलढाणा जिल्ह्यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवलेली आहे दिनांक 12 जुलै रोजी त्यांनी देऊळगाव राजा येथे शिवसेना शहरप्रमुख गोपाळ व्यास यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
या भेटीतच त्यांनी शहर शिवसेनेने केलेल्या कामाचा आढावा घेतला व शहरात समाधानकारक पक्षाचे काम सुरू असल्याबाबत आनंद व्यक्त करून भविष्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज तयार करावी त्यांना शिवसेनेने प्रवा हात आणावे असे सांगितले.
यावेळी या विभागाचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर, शहर प्रमुख गोपाल व्यास, सचिन व्यास, सुदाम काकड, संतोष तलबे, बंटी सूनगत. बलवंत सिंग बावरे. उपस्थित होते