घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
88 ग्रँम सोन्याचे दागिणे व नगदी 8,64,460/- रू मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 17/06/2025 रोजी पोलीस स्टेशन आर्वी येथे फिर्यादी नामे नेहा सचिन घोटकर वय 37 वर्ष रा. साईनगर आर्वी जि. वर्धा हे दिनांक 10/06/2025 ते 17/06/25 दरम्यान बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरातील कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील अलमारी चे लॉक तोडून घरातील अज्ञात इसमाने चोरी करून नेला. अश्या फिर्यादी यांचा तक्रारीवरून पोलीस स्टेशन आर्वी अप क्रमांक 621/2025. कलम 331(3),331(4),305 (अ), 62 BNS नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
नमुद गुन्हा अज्ञात आरोपीतांने केला असल्याने तो उघड होण्याकरीता स्था.गु.शा वर्धा हे समांतर तपास करीत असल्याने घटणास्थळी भेट देली असता गोपनीय बातमीदाराच्या व तांत्रीक माहीतीवरुन सदर गुन्हा भारताचे विविध राज्यात घरफोडी करणारे मध्य प्रदेश राज्य जिल्हा बुराहणपूर व तसेच खरगोन या जिल्ह्यातील अंतरराज्य टोळी असल्याचे निष्पन्न झाल्याने स्था.गु.शा वर्धा येथील एक पथक पोलीस स्टेशन चैनपूर जि. खरगोन मध्य प्रदेश येथे रवाना होवुन स्थानिक पोलीसांच्या मदतीने आरोपी क्र. 1) रत्नामसिंग पिता नहारसिंह बावरी वय 40 वर्ष. 2) राजेंद्रसिंह पिताजीत सिंह वय 27 वर्ष,दोन्ही राहणार सिगनूर त. गोगवा जि. खरगोन (MP).3) नेहांगसिंह पिता सुक्खासिंह भोंड वय 45 वर्ष रा पाचोरी त.खकणार जिल्हा बुराहणपूर राज्य मध्यप्रदेश येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरच्या आरोपीतांना त्यांच्या गावात ताब्यात घेण्यासाठी गेलो असता त्यांना पोलीस आल्याची चाहुल लागताच गावातुन पसार झाले तसेच आरोपी क्रमांक 1. रत्नामसिंग पिता नहारसिंह बावरी याचे घराची घरझडती घेतली असता आरोपीताचा नातेवाईक भायेलाला पिता हारसिंह भाटिया वय 59 वर्ष रा.ढसळगाव जि. खरगोन याने सांगितले की वर्धा जिल्हा येथील चोरी गेलेले सोन्याचे दागिणे व नगदी मुद्देमाल माझा जवळ ठेवुन असल्याने तो मी तुम्हाला काढुन देतो.सदर मुद्देमालाचे वर्णन.1) अंदाजे 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र 2) अंदाजे 23 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी. 3) अंदाजे 01 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी. 4) अंदाजे 06 ग्रॅम वजनाची दोन कानातील टॉप्स. 5) 15 ग्रॅम वजनाची सोन्याची 02 अंगठी.असे एकुण 88 ग्रँम किं.7,84,460/- रु 6) रोख रक्कम 80,000/- रुपये. असा एकूण 8,64,460/- रु चा मुद्देमाल हस्तगत करुन पोलीस स्टेशन आर्वी जि. वर्धा यांचा ताब्यात देण्यात आला नमुद गुन्ह्यातील तिन्ही पसार आरोपीचा शोध घेणे सुरु आहे.
सदरची कार्यवाही मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधिक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शानात पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी,पोउपनि उमाकांत राठोड, पोउपनी प्रकाश लसुंते, पोहवा. शेखर डोंगरे, पो. शि. विकास मुंडे. पो.शि. सुगम चौधरी, पो.शि.शुभम राउत, चालक राहुल लुटे, रितेश गेटमे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.