ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाविद्यालयाने सुरू केलेल्या गुरूपौर्णिमा उत्सवाचे अनुकरण व्हावे- अधिष्ठाता डाँ. विलास आतकरे

गुरूपौर्णिमा निमित्त सावलीमध्ये "सावली रत्न" पुरस्काराने सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली : भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान सर्वोच्च असुन जीवन मूल्यांची शिकवन देणारा, अंधारामधुन प्रकाशाकडे घेवुन जाणारा असल्याची नोंद घेवुन महाविद्यालयाने सुरू केलेला गुरूपौर्णिमा महोत्सव वाखाणण्या योग्य असुन याचे अनुकरण व्हावे, अशी अपेक्षा डाँ.पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाँ. विलास अतकरे यांनी व्यक्त केली.

भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावली द्वारा संचालित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावली आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे सभागृहात गुरूपौर्णिमा निमित्त विशेष सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे सचिव राजाबाळ संगीडवार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी डाँ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय मूलचे अधिष्ठाता डाँ. विलास अतकरे, गोंडवाना विद्यापीठाच्या पीएम-उषाचे समन्वयक डाँ. प्रशांत ठाकरे, तालुका पञकार संघाचे सचिव सुरज बोम्मावार आदी उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्व. वामनरावजी गड्डमवार यांच्या प्रतिमेला अभिवादन आणि दिप प्रज्वलनाने सोहळ्याची सुरूवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डाँ. ए. चंद्रमौली यांनी प्रास्ताविक करतांना सावली रत्न पुरस्काराचे निवड, निकष व दरवर्षी महाविघालयांच्या वतीने सावली तालुक्यातील जेष्ठ आदर्श व्यक्तिमत्वाचां सन्मान करणार असल्याचे यावेळी डाँ. चंद्रमौली यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांचे हस्ते

सावली तालुक्यातील निवृत्त मुख्याध्याफक तथा सामाजीक कार्यकर्ते सुधाकर गाडेवार यांचा सावली रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डाँ. राम वासेकर यांनी सन्मानपञाचे वाचन केले. यावेळी डॉ. विलास अतकरे, समन्वयक डॉ. प्रशांत ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देतांना सत्कारमुर्ती सुधाकर गाडेवार यांनी निस्वार्थ भावनेने केलेले कार्यामूळे आज हा सन्मान प्राप्त झाल्याने मन भरून आले असून केलेल्या कार्यची ही पावती असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाबाळ संगीडवार यांनी सुधाकरजी गाडेवार यांच्या कार्यकुशल नेतृत्व गुणांचा व निस्वार्थ सेवेचा हा सन्मान असून गाडेवार खरोखर सावली रत्न असल्याचे सांगीतले.

      कार्यक्रमाचे संचालन प्रा. संदीप देशमुख यांनी केले. सावली रत्न पुरस्कार निवड समितीचे प्रमुख डॉ. अशोक खोब्रागडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, माजी विद्यार्थी, प्राध्यापक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये