अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट वर्क्सच्या वतीने- गरजू शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अल्ट्राटेक सिमेंट माणिकगड ने त्यांचे युनिट हेड अतुल कन्सल, उपाध्यक्ष मानव संसाधन मुकेश गहलोत आणि ई आर हेड नवीन कौशिक यांच्या मार्गदर्शनातं सतत आजूबाजूच्या गांवाच्या सर्व बाजूने विकासा करिता धडपड करीत आहेत,त्याकरिता प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे या उद्देशाने, अल्ट्राटेक सिमेंटच्या माणिकगड सिमेंट वर्क्सने त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी( सी एस आर) उपक्रमांतर्गत एका महत्त्वपूर्ण वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले.
या उपक्रमांतर्गत, *राजुरा तालुक्यातील ६ गावे, जिवती तालुक्यातील ४ गावे आणि कोरपना तालुक्यातील १ गाव* अशा एकूण ११ ग्रामीण भागातील गावांमध्ये यात मानोली, जामणी, बैलंपुर, गोवारीगुडा, बॉम्बेझरी, नोकरी, असापूर, पेद्दासापूर, लिंगंडोह, गढपंधरवणी आणि गोपालपूर येथील शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटण्यात आल्या. या वह्यांमुळे त्यांना शिक्षणात मदत होईल आणि शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. एकूण *11 गावातील शाळांमधील ४५० विद्यार्थ्यांना* सिंगल लाईन नोटबुक, फोर लाईन नोटबुक, स्क्वेअर नोटबुक आणि रजिस्टर अशा एकूण १७८६ वह्यांचे वाटप करण्यात आले.
वह्या वाटपाच्या कार्यक्रम प्रसंगी गावातील पदाधिकारी आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहकार्य केले. यामध्ये
* *मानोली :मुख्याध्यापक जी.व्ही. पवार*, शिक्षक *सीता मेश्राम*, वनपाल सोयम , *राजेश पवार*, एसएमसी अध्यक्ष *शंकर रामटेके*, ग्रामपंचायत शिपाई *दुर्योधन वडगुडे*, उपसरपंच *गणेश नैताम*.
* *जामणी: मुख्याध्यापक भास्कर मडावी*, एसएमसी अध्यक्ष *भास्कर मंडळी*, सरपंच *जगदीश किन्नके*.
* **बलमपुर:* मुख्याध्यापक *कानिराम पवार*, शिक्षक *किशोर मांडे*, *विनोद चव्हाण*, एसएमसी अध्यक्ष *सुनीता मडावी*.
* *गोवारीगुडा:* मुख्याध्यापक *विष्णू बाडे*, शिक्षक *शिवाजी पवार*, एसएमसी अध्यक्ष *गंगासागर पिलवान*, सदस्य सुरेखा वर्मा, उषा कैथल*, शिक्षण प्रेमी इंदुताई गौरकर.
* *नोकारी : मुख्याध्यापक विनायक राठोड*, शिक्षक *बाबू राठोड*, *नामदेव पवार*, एसएमसी अध्यक्ष *वीणा नैताम*, सरपंच *मनीषा पेंडोर*.
* *बॉम्बेझरी:* शिक्षक प्रकाश राठोड*, एसएमसी उपाध्यक्ष *आशा राजूरकर* वइतर पालकवर्ग.
* *आसापूर:* मुख्याध्यापक *अंकुश राठोड*, सरपंच *मंगेश सोयम*, मोबिलायझर *उज्वला ताई*, माजी सरपंच *सोयम ताई*.
* *गढपांढरवणी:* मुख्याध्यापक *छायाताई गोखरे*, सरपंच *मंगेश सोयम* व गावातील इतर पालकवर्ग.
* **पेदासापूर मुख्याध्यापक श्री. सोनार सर*, शिक्षक *संजय राठोड*, सामाजिक कार्यकर्ते *सुदाम राठोड*, सरपंच मंगेश सोयम*.
* *लिंगंडोह:* मुख्याध्यापक *श्री. लांजे सर*, शिक्षक *पाटील मॅडम*, सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड, आशा वर्कर मीरा राठोड, राजूदास चव्हाण व नीलाबाई राठोड
*गोपालपूर :* सरपंच किशोर वेडमे, मुखध्यापक संदीप कोरपे, शिक्षिका देवींद्रा खोब्रागडे,शा. व. अध्यक्ष नागोराव मडावी, स. स. शी. मार्गदर्शिका जागृती निलेवार. इत्यादी उपस्थित मान्यवर उपस्थित होते.
ही पहल अल्ट्राटेक सिमेंटची शिक्षणाप्रती असलेली कटिबद्धता दर्शवते, ज्याचा उद्देश शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून विद्यार्थ्यांसाठी शिकण्याची प्रक्रिया सुलभ करणे आहे. कंपनीचा विश्वास आहे की, असे प्रयत्न मुलांचे शैक्षणिक भविष्य उज्वल बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास मदत करतात.
अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट वर्क्सने त्यांच्या सी एस आर उपक्रमांतर्गत शिक्षण, आरोग्य सेवा, उपजीविका निर्मिती आणि समुदाय पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. वह्या वाटपाचा हा कार्यक्रम याच व्यापक सामाजिक विकास उपक्रमाचा एक भाग आहे, ज्याचे उद्दिष्ट स्थानिक समुदायांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे आहे.
गावातील सर्व पदाधिकारी, शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट वर्क्स सीएसआर टीमचे धन्यवाद मानले.
हा उपक्रम सी एस आर चे संगित चांदेकर व सोनाली ठाकोर यांनी यशस्वी केलात.