ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून तात्काळ भरपाई देण्यात यावी

शिवसेना तालुका अध्यक्ष उमेश गोलेपल्लीवार यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली  चंद्रपूर जिल्हा हा प्रमुखतः कृषिप्रधान आहे. जिल्ह्यातील लाखो नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान, कापूस आदी पिकांची पेरणी केली आहे. मात्र,

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदतीची आवश्यकता आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसेना तालुका अध्यक्ष उमेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत पिके वाहून गेली आहेत, तर काही ठिकाणी उगम पातळीवरच बी बियाणे कुजल्याने दुबार पेरणीची वेळ आली आहे.

अशा स्थितीत शासनाने तत्काळ नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शिवसेना तालुका अध्यक्ष उमेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये