ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुस नगर परिषदेची कडक चेतावणी: मोकाट फिरणाऱ्या जनावरांवर कारवाई

खर्च वसूल केला जाणार

चांदा ब्लास्ट

घुग्घुस नगर परिषदेकडून स्थानिक नागरिकांसाठी एक महत्त्वाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांबाबत कडक पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. अशा जनावरांची जबाबदारी संबंधित मालकांची असून, त्यांनी आपल्या जनावरांची योग्य ती देखभाल करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नगर परिषदेच्या सूचनेनुसार, जर कोणाचीही जनावरे मोकाट फिरताना आढळली, तर ती पकडून थेट कांजी हाऊसमध्ये ठेवण्यात येतील आणि त्यांच्यावर होणारा सर्व खर्च संबंधित जनावर मालकाकडून वसूल करण्यात येणार आहे.

नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी सांगितले की, शहरातील स्वच्छता, नागरिकांचे आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व घुग्घुसकरांना विनंती करण्यात येते की त्यांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये