महाराष्ट्र राज्य बास्केट बॉल संघटनेच्या कार्यकारी मंडळात कार्यकारी सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल यांचा भव्य नागरी सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार
ब्रम्हपुरी :- प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल यांची महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या कार्यकारी मंडळावर कार्यकारी सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल डॉ.देविदास जगनाडे व प्रा.अतुल देशकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला
याप्रंगी प्राचार्य आश्विन चंदेल यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांची मान्यता महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेला मिळाल्यामुळे महाराष्ट्रात मागील काही काळापासूून सुरु असणाऱ्या तांत्रिक बाबीला विराम मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या आंतरजिल्हा बास्केटबॉल स्पर्धा जसे 18 वर्षा खालील मुले आणि मुली, 16 वर्षा खालील मुले आणि मुली, 13 वर्षा खालील मुले आणि मुली, आणि पुरुष आणि महिला संघाच्या स्पर्धा पुढील महिन्यापासून आयोजित करण्यात येतील .त्यामुळे या पुढे महाराष्ट्रात बास्केटबॉल खेळाचे खेळाडू यांना आपले खेळाचे नैपुण्य आणि कौशल्य विविध स्पर्धेच्या माध्यमाने दाखवण्यात यश मिळेल.
याप्रसंगी प्रा.अतुल देशकर यांनी ब्रह्मपुरी येथे दोन नवीन बास्केटबॉल चे कोर्ट लवकरात लवकर तयार होईल आणि येत्या डिसेंबर महिन्यात गेल्या 40 वर्षापासून सन्मित्र क्रीडा मंडळ द्वारे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन ज्या पद्धतीने आपल्या ब्रह्मपुरी शहरात आयोजित करत होतो त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात या स्पर्धेचे भव्यआयोजन करण्यात येईल असा आशावाद त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
सभेचे अध्यक्ष डॉक्टर देविदास जगनाडे यांनी चंद्रपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेतर्फे संपूर्ण जिल्ह्यामध्ये बास्केटबॉल चा प्रचार आणि विकास कसा जास्तीत जास्त करता येईल त्याकडे संघटना लक्ष देईल आणि संपूर्ण जिल्ह्यात या करिता बास्केटबॉल कोर्टची निर्मिती करण्यावर भर दिला जाईल जेणेकरून जिल्यातील जास्तीत जास्त खेळाडू बास्केटबॉल खेळू शकतील आणि आल्या दर्जेदार कौशल्याने अंतर जिल्हा बास्केटबॉल स्पर्धेत आपल्या जिल्ह्याचा नाव उंचावले अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या.
या प्रसंगी सन्मित्र क्रीडा मंडळाचे नवनियुक्त सचिव श्री पवन जयस्वाल यांचा चंद्रपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या वतीने प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीकरीता आणि त्यांच्या नेतृत्वात सन्मित्र क्रीडा मंडळाचे कार्य उतोरात्तर मोठे व्हावे अशी शुभेचा देण्यात आली
चंद्रपूर जिल्हा बास्केटबॉल संघटना आणि सन्मित्र क्रीडा मंडळ ब्रह्मपुरी यांचे संयुक्त बैठक दिनांक 12 7 2025 ला मा.अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा बास्केटबॉल संघटना ,प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली ब्रम्हपुरी येथील झाडे सेलिब्रेशन हॉल ब्रह्मपुरी येथे संयुक्त सभा घेण्यात आली.
सदर सभेकरिता सन्मित्र क्रीडा मंडळ ब्रह्मपुरी चे अध्यक्ष आणि चंद्रपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार प्रा. अतुल देशकर, प्रा. उमेश मिश्रा श्री अतुलभाऊ गौरशेट्टीवार, प्रा.मुकेश रामटेके, डॉ. विजय दिघोरे डॉ. संजय कुंभारे व मंडळाचे नवनियुक्त सचिव श्री पवन जयस्वाल, श्री सुभाष अग्रवाल श्री राजू जाजू, प्रामुख्याने उपस्थित होते. सदर सभेला चंद्रपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य त्याचप्रमाणे सन्मित्र क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते.
सभेचे संचालन श्री मनोज वठे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर संजय कुंभारे यांनी केले