ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पेलोराचे गजानन जुनघरी उपक्रमशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

    आपल्या पारंपरिक शेती व्यवसायात थोडा बदल करून जैविक खते वापरून उसाची लागवड करून आरगानिक गुळाची निर्मिती करणारे पेलोरा (ता. राजुरा) येथील युवा शेतकरी गजानन जुनघरी यांना उपक्रमशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

     लक्ष्मीनगरस्थित धनोजे कुणबी समाज मंदिरात झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तथा आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रमात गजानन जुनघरी यांना ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष एड. पुरूषोत्तम सातपुते, सचिव अतुल देऊळकर, कोषाध्यक्ष अरुण मालेकर, सहसचिव प्रा. नामदेव मोरे, उपाध्यक्ष विनोद, पिंपळशेंडे, सल्लागार मनोहर पाहुणकर, देवराव कोंडेकर, सविता कोट्टी आदींची उपस्थिती होती.

      उसलागवड, गुळ निर्मिती आणि विक्री स्वतः जुनघरी करीत असून गाव परिसरात त्यांच्या गुळास विशेष मागणी आहे. पारंपरिक शेती सोबत गुळ निर्मितीचा यशस्वी प्रयोग करून जुनघरी यांनी नवयुवकांचे लक्ष वेधून घेतले आहे  पुरस्काराबद्दल त्यांचे अनेक शेतकरी बंधूंनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये