ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महागड्या गाडीने जनावराची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचे जाळ्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         दिनांक 10/03/2026 रोजी फिर्यादी नामे आशिष मधुकरराव माहुरे, वय 33 वर्ष, रा. नगरपरिषद ले आऊट, देवळी यांनी पोलीस स्टेशन देवळी येथे येऊन तोंडी रिपोर्ट दिली की, त्यांची 1 गाय, मारोतराव झाडे यांची 1 गाय, नरहरी गुलाबराव कामडी यांची 1 गाय, मंगल जी प्रभाकर तलमले यांची 1 गाय, शंकर केशवराव कामडी यांची 1 गाय व प्रज्वल पाचपोर यांचा 1 गोरा अशे एकूण 6 जनावरे अज्ञात चोरट्याने दिनांक 01/03/2026 व दिनांक 02/03/2026 चे रात्र दरम्यान चोरून नेल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून दिनांक 10/03/2026 रोजी पोलीस स्टेशन देवळे येथे अप. क्रमांक 146/26 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद असून तपासावर आहे.

                   सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा पथकातर्फे वर्धा समांतर तपास करीत असताना cctv फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे जिल्हा नागपूर येथे स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथक जाऊन तपास करीत असताना दिनांक 17/03/2026 रोजी मुखबिर कडून गोपनीय माहिती मिळाली यशोधरा नागपूर येथे राहणारा अब्दुल अलीम अब्दुल लतीफ हा काळा रंगाच्या एम जी हेक्टर गाडी क्रमांक MH 47 AU 5366 ने साथीदारासाह सिवनी कडून नागपूरकडे येत आहे अशा माहितीवरून पंच व पोस्टाफसह सिवनी ते नागपूर रोडवरील कळमना पुलाजवळ नाकाबंदी करीत असताना काही काही वेळाने काळा रंगाच्या एम जी हेक्टर गाडी क्रमांक MH 47 AU 5366 ही येताना दिसली तिला सापळा रचून पो. स्टफ चे मदतीने मोठ्या शिताफीने थांबवून गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये तिन इसम मिळून आले. त्यांना त्यांचे नाव, गाव, पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव

1) अब्दुल अलीम अब्दुल लतिक, वय 39 वर्ष, रा. गौरी नगर, रांजणगाव, वार्ड नंबर 14 जि. रांजणगाव, राज्य – छत्तीसगड, ह.मु. यशोधरा नगर नागपूर, 2) मोहम्मद अर्षद मोहम्मद अजगर शेख, वय 36 वर्ष, रा. यासीन प्लॉट ताज सरोवर मज्जिद जवळ बडा ताजबाग, नागपूर

3) रोशन धर्मेंसिंग उईके, वय 26 वर्ष, रा. आजरी – माजरी काच कंपनी जवळ कळमना, ता . जि.नागपूर असे सांगितले.

 तिन्ही आरोपीतांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी अंदाजे पंधरा दिवसा पूर्वी पो.स्टे. देवळी येथून काळा रंगाच्या एम जी हेक्टर गाडी क्रमांक MH 47 AU 5366 ने सहा जनावर चोरून आणल्याचे सांगितल्याने आरोपीतांचे ताब्यातून आरोपीतांनी गुन्ह्यात वापरलेली काळा रंगाच्या एम जी हेक्टर गाडी क्रमांक MH 47 AU 5366 व नगदी 30,000/- रु. असा एकूण जुमला किंमत 15,30,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करून जनावर चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. आरोपी व जप्त मुद्देमाल गुन्ह्याचे पुढील तपास कामी पोलीस स्टेशन देवळी यांचे ताब्यात देण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन देवळी हे करीत आहे.

 सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. सौरभकुमार अग्रवाल सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. सदाशिव वाघमारे सा., स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे पो.उपनि. प्रकाश लसुंते, स.फौ. मनोज धात्रक, पो.हवा. हमीद शेख, पो.हवा. महादेव सानप, पो. हवा. दिनेश बोथकर, पो.हवा. अक्षय राऊत, पो.अ.विनोद कापसे,सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये