ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा पोलीस मुख्यालयात भव्य रक्तदान शिबीर

२३ पोलीस अधिकारी व अंमलदारांचे 'रक्तदान'

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा पोलीस प्रशासन, वर्धा आणि सामान्य रुग्णालय, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आज पोलीस मुख्यालय येथील ‘आशीर्वाद मंगल कार्यालय’ येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात पोलीस दलातील एकूण २३ अधिकारी व अंमलदारांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आपला सामाजिक सहभाग नोंदवला.

प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन : या शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात करण्यात आले. पोलीस दलाने केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्याचेच काम न करता, रुग्णांच्या प्राणां वाचवण्यासाठी केलेल्या या कार्याचे दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

सामान्य रुग्णालयाची चमू रक्त संकलनाची संपूर्ण प्रक्रिया सामान्य रुग्णालय, वर्धा येथील तज्ज्ञ पथकाने पार पाडली. यामध्येः डॉ. मुस्कान, प्रवीण गावंडे, अंकुश कांचनपुरे, परिचारिका वैशाली जगताप, किशोर महाजन यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी तांत्रिक सहकार्य देऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. विशेष परिश्रम सदर रक्तदान शिबिराचे नेटके नियोजन आणि कार्यक्रम यशस्वी करण्याकामी सहा. पोलीस निरीक्षक (API) आशिष चिलांगे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वयामुळे पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

जिल्हा सामान्य रुग्णालयात होणारा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी आणि गरजू रुग्णांना तातडीने रक्ताचा पुरवठा व्हावा, या उदात्त हेतूने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी यापुढेही असे विधायक उपक्रम राबविले जातील, असे यावेळी नमूद केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये