कर्मचारीने गळफास घेऊन आत्महत्या केली., कारण अद्याप अस्पष्ट

चांदा ब्लास्ट
घुग्घुस येथील अमराई वॉर्डात राहणाऱ्या एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून संपूर्ण परिसरात ती चर्चेचा विषय ठरत आहे. मृत व्यक्तीचे नाव राहुल कुमार (वय 45 वर्षे) असे असून तो एसीसी (अदानी) कंपनीच्या नवीन पॅकिंग प्लांटमध्ये कार्यरत होता.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राहुल कुमार याने 14 जुलैच्या संध्याकाळी एसीसी व्हाईट हाऊस मार्गावरील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे प्रकरण अधिकच रहस्यमय बनले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील, अनिल बैठा, एपीआय अनभूले व रवी वाभीटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मर्ग दाखल केला असून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.