बनावट तक्रार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर कठोर कारवाई करा
गजानन पोटे यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गजानन पोटे यांच्या नावे अज्ञात व्यक्तीने वरिष्ठ अधिकाऱ्या विरोधात बनावट तक्रार दिली असून,या खोट्या तक्रारी बाबत सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संघटनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गजानन पोटे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे केली आहे.
श्री गजानन पोटे अन्चरवाडी क्षेत्रात वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत तसेच महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत,कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक अडी अडचणी समस्या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन, चर्चा करून कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्याचे काम केले आहे.
संघटनेचा नावलौकिक वन विभागात झाला आहे,अशातच कोणीतरी अज्ञात व्यक्तीने स्वतःच्या हस्ताक्षरात वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात खोटी तक्रार केली असून यात पद, गाव, सही, व आपल्या नावाचा उपयोग करून तक्रार दाखल केली असून ,या खोट्या तक्रारी बाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गजानन पोटे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे केली आहे.
निवेदनाच्या प्रतिलिपी मूख्य वन संरक्षक अमरावती, उप वन संरक्षक बुलढाणा, पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन देऊळगाव राजा यांना पाठविण्यात आल्या आहेत.