ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“प्लास्टिकमुक्त गाव” संकल्पना प्रभावीपणे राबवा-. मच्छिंद्रनाथ धस

कोरपना तालुक्यात घनकचरा व्यवस्थापन कामांची पाहणी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : दिनांक ०६ एप्रिल २०२६ रोजी पंचायत समिती कोरपना अंतर्गत ग्रामपंचायत नांदा आवाळपूर, हिरापूर व बिबी येथे मा. प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मच्छिंद्रनाथ धस यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय पाहणी दौरा संपन्न झाला. यावेळी “प्लास्टिकमुक्त गाव” संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

सदर दौऱ्याचा मुख्य उद्देश १५ वा वित्त आयोग व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) यांच्या अभिसरणातून ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांची प्रत्यक्ष पडताळणी करणे हा होता. यावेळी सार्वजनिक शोषखड्डे, कचराकुंड्या, प्लास्टिक संकलन केंद्र आदी विविध घटकांची सविस्तर पाहणी करण्यात आली.

पाहणीदरम्यान कामांची कार्यक्षमता, गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी तसेच खर्चाचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. विशेषतः प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर भर देत ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टिक विलगीकरण शेड उभारणी, कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण व सुरक्षित साठवण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी “प्लास्टिकमुक्त गाव” संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. तसेच सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, घनकचरा व्यवस्थापनाची शाश्वत प्रणाली विकसित करणे व प्लास्टिकमुक्त गाव निर्मितीसाठी पुढील कार्यवाहीबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये