गायक कलावंताचा भारतीय संविधान भेट देऊन केला सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
गौळ येथे दि.5 मे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळा वर्धापन दिन व जेष्ठ नागरिक सोहळा तसेच पुतळा सौंदर्यकरण दहा लाख कामाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम मारोती लोहवे यांनी आयोजित कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वर्धा रिपाइचे विजय आगलावे देवळी नगर परिषद चे उपाध्यक्ष राहुलजी चोपडा निलेश कसणारे, दशरथ भुजाडे हे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. मंचकावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते पूर्णकृती पुतळ्याचे पूजन हार अर्पण नंतर 10 लाख कामाचे भूमिपूजनाच्या फलकाचे नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले.
गावातील ज्येष्ठ पुरुष व स्त्रियांचा अनेकाचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पाहण्याचे समुचित भाषणे झाली. त्यानंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध नामवंत गायक सुरेंद्र डोंगरे मानव मुक्ती बोध कला मंच चे उपाध्यक्ष तथा पाथरीचे बहुजन प्रबोधन कला मंचाचे संचालक नारायण जारुंडे व वर्धेचे सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधनकार पद्माकर कांबळे, गिरोली चे मंगेश थूल यांच्या हस्ते मंचकावर मुख्य गायकाचा शाल, भारतीय संविधान व पुष्पगुच्छ देवून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.



