ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीत तेली समाजाचा कोजागिरी स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न!

_समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; स्नेह, संवाद आणि एकोप्याचा दिला संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी  :_ सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि आपुलकीचे नाते अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने गोंडपिपरी येथे तेली समाजाचा कोजागिरी स्नेहमिलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सोमवार, दिनांक २ रोजी खैरे कुणबी समाज भवन येथे आयोजित या सोहळ्याला तेली समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून तेली समाज अध्यक्ष अरुण वासेकर, किशोर वैरागडे, विजय सोमणकर, योगेश मुंगले, नेमदेव रागीट, प्राध्यापक गभणे, हरिश्चंद्र बोबाटे, तुळशीदास गबने, पुणेश मुंडले, सचिन मेहरकुरे, नरेश भुरसे उपस्थित होते.

कोजागिरीच्या निमित्ताने आयोजित या स्नेहमिलन सोहळ्यात समाजबांधवांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. परस्परांशी संवाद साधत विचारांची देवाणघेवाण केली. आनंद, उत्साह आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे समाजातील एकजुटीची भावना अधिक दृढ झाली.

आजच्या धावपळीच्या जीवनात समाजातील बांधवांनी एकत्र येणे, परस्परांशी संवाद साधणे आणि सामाजिक संबंध जपणे ही काळाची गरज आहे. अशा स्नेहमिलन सोहळ्यांच्या माध्यमातून समाजातील ऐक्य, सहकार्य आणि बंधुभावाला नवी दिशा मिळते, अशी भावना यावेळी उपस्थितांमधून व्यक्त झाली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व समाजपदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उपस्थित समाजबांधवांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले. सहपरिवार उत्साहपूर्ण सहभागामुळे कोजागिरी स्नेहमिलन सोहळ्याची सांगता आनंददायी वातावरणात झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये