ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा कडुन विदेशी दारुची अवैद्यरित्या साठवणूक करणाऱ्या ०२ आरोपीतांवर रेड

२९ पेटी विदेशी दारु असा एकुण ५ लाख ७४ हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक ०४/११/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे एक पथक पोलीस स्टेशन, खरांगणा हद्दीत पेट्रोलिंग करित असतांना गोपनीय बातमीदारा कडुन खात्रीशिर माहीती मिळाली की, १) मुकेश कोकाटे व २) स्नेहल काटकर दोन्ही राहणारा वर्धा यांनी काचनुर शेत शिवारातील भाष्कर चोपडे रा. येळाकेळी यांचे शेतातील विटाचे मातीचे बांधकाम केलेले ज्यावर टिना टाकुन असलेल्या रूममध्ये अवैध्यरित्या विदेशी दारू साठवुन ठेवली आहे. अशी माहीती प्राप्त झाल्याने सदरची माहीती स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा चे प्रमुख श्री. विनोद चौधरी यांना देवुन त्यांनी दिलेल्या सुचना व निर्देशाप्रमाणे अत्यंत गोपनीयता बाळगुण स्थानीक गुन्हे शाखेचे पथका मार्फत काचनुर येथील शेत शिवारातील भाष्कर चोपडे यांचे शेतातील विटाचे मातीचे बांधकाम केलेले ज्यावर टिना टाकून असलेल्या रूमची पाहनी केली असता सदर रूममध्ये १) २० खडर्यांचे खोक्यात रॉयल स्टॅग कंम्पनीच्या विदेशी दारूने भरलेल्या १८० एमएल. च्या ९६० सिलबंद शिश्या प्रती शिशी ४००/- रू. प्रमाणे ३,८४,०००/- रू. २) ०५ खडर्याचे खोक्यात ऑयकॉनीक वाईट कंम्पनीच्या विदेशी दारूने भरलेल्या १८० एमएल. च्या २४० सिलबंद शिश्या प्रती शिशी ४००/-रू. प्रमाणे ९६,०००/- रू. ३) रॉयल चॅलेन्ज कंम्पनीच्या विदेशी दारूने भरलेल्या १८० एमएल. च्या १९२ सिलबंद शिश्या प्रती शिशी ४००/- रू. प्रमाणे ७६,८००/- रू. ४) ब्लेन्डर प्राईड कंम्पनीच्या विशी दारूने भरलेले ७५० एमएल. चे ०९ बंफर प्रती २,०००/- रू. प्रमाणे १८,०००/- रू. असा एकुण जु.कि. ५,७४,८००/-रु. मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करून दोन्ही आरोपी नामे १) मुकेश कोकाटे व २) स्नेहल काटकर दोन्ही राहणारा वर्धा यांचे विरूध्द पोलीस स्टेशन खरांगणा येथे कलम ६५ (ई), ७७ (अ), ८३ महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनी. राहुल इटेकार, पोलीस अंमलदार भुषण निघोट, धर्मेंद्र अकाली, अमोल नगराळे, मंगेश चावरे सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये