ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन, सावंगी (मेघे) हद्दीतील धोकादायक इसमाची एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे रवानगी.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन, सावंगी (मेघे) हद्दीतीत धोकादायक इसम नामे राजु रामु तुमडाम वय ४० वर्षे रा. भुगांव ता. जि. वर्धा याचेविरुध्द पोलीस स्टेशन, सावंगी (मेघे) चे अभिलेखावर सन २०२१ पासुन शिवीगाळ करुन मारहाण करणे, मारण्याची धमकी देणे, घातक हत्यार बाळगुन धामधुम करणे, मारहाण करुन जखमी करणे, दारु पिवुन धुमधाम करणे असे एकुण १० गुन्हे नोंद आहे. सन २०२१ पासुन स्थानबध्द इसम नामे राजु रामु तुमडाम याने पोलीस स्टेशन, सावंगी (मेघे) परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचेविरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होवुन सार्वजनीक जिवन विस्कळीत झाले होते. राजु रामु तुमडाम याच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन, सावंगी (मेघे) अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने व त्याची गुन्हेगारी गतिवीधी थांबत नसल्याने त्याचेविरुध्द कलम १२९ (ई) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत एक वर्षाकरीता. अंतिम बंधपत्र घेण्यात आले होते. परंतु अशा प्रतिबंधक कार्यवाहीस सुध्दा तो जुमानत नसुन त्यानंतरही सतत गुन्हे करीत होता.

त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, श्री. विनोद गिरी, पोलीस स्टेशन, सावंगी (मेघे) यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, मा. श्रीमती वान्मथी सी. यांचेकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा यांनी दिनांक ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन राजु रामु तुमडाम यास येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले होते. स्थानबध्द आदेशांन्वये त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे.

वर्धा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी, तसेच आगामी दिवाळी सण उत्सव शांततेत पार पडावा या उद्देशाने अशाच प्रकारे अवैधरीत्या दारुविक्रेत्यांबर, तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तींवर एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मथी सी., तसेच मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल, यांनी दिलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये