गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत विविध कारागृहामध्ये स्थानबध्द

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सन – २०२५ मध्ये एकुण १८ दारुविक्रेते आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत विविध कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले होते. तसेच सन २०२६ मध्ये अद्याप पावेतो १२ गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्तींना तसेच अवैध दारुविक्रेते यांना विविध कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. सुनिल महाडीक, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा, पो.नि. विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार अमोल आत्राम, आशिष महेशगौरी नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.नि. विनोद गिरी, पोलीस अंमलदार सचिन घेवंदे, शुभांगी महाजन, संजय पंचभाई, अनिल वैदय, अमोल जाधव, हर्षवर्धन मुन पोलीस स्टेशन, सावंगी (मेघे) यांनी केली आहे.



