स्वाती मोगंरकर हिची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्तीसाठी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (NMMS) चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, देवाडा खुर्द येथील एकूण २७ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी नंदिनी राकेश गोरंतवार, वंशीका मधुकर सातरे, निधी गुणवंत टेकाम, दिव्या विकास परचाके आणि स्वाती ऋषिदेव मोगंरकर हे पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यापैकी स्वाती ऋषिदेव मोगंरकर हिची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असून तिला इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत दरवर्षी १२ हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे.
स्वातीच्या या यशाबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडील तसेच विषय शिक्षक संजय नागुलवार यांना दिले आहे.
या यशाबद्दल राष्ट्रमाता ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ, देवाडा खुर्दचे अध्यक्ष आबाजी पा. बुरांडे, सचिव शंकरराव टिकले, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य दिलीप मॅकलवार, तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वातीचे अभिनंदन केले आहे.



