ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर व्यवस्थापनाची कौतुकाची थाप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री व्यंकटेश महाविद्यालयाचा बारावी वाणिज्यचा १०० टक्के तसेच कला शाखेचा ९६ टक्के निकाल लागला. यामध्ये वाणिज्य व कला शाखेतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालय व्यवस्थापनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या या कौतुक सोहळ्यास महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी सौ. छायाराजे जाधव, प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर गोरे व शिक्षकवृंद उपस्थित होते.
महाविद्यालयाची शिस्त, शिक्षकांचे संस्कार तसेच अध्यापन कार्य याबाबत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आणि महाविद्यालयाला त्यांच्या यशाचे श्रेय दिले आहे.



