देऊळगाव राजा येथे गायत्री परिवाराचे वतीने शताब्दी वर्षानिमित्ताने ज्योती कलश यात्रा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गायत्री परिवार हरिद्वार शताब्दी वर्ष निमित्ताने श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीमध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भव्य ज्योती कलश यात्रा काढण्यात आली या सोबतच पंचकुंडी यज्ञ दीप यज्ञ व सत्संगचे मोठ्या प्रमाणात आयोजन दिनांक 13 जुलै रोजी करण्यात आलेले होते या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ गायत्री परिवाराशी जोडल्या गेलेल्या परिवाराने व इतर भक्तांनी घेतला.
याबाबत सविस्तर असे की गायत्री परिवाराचे पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या प्रेरणेने युग निर्माण योजना साठी संकल्प करण्यात आला व 1926 पासून आज पर्यंत या ठिकाणी अखंड दीप प्रज्वलन सुरू असून याला 2026 मध्ये शतक झाल्यामुळे शताब्दी वर्ष साजरे करण्यात येत असून ही अखंड ज्योत भारतासह जगातील 150 देशांमधून भ्रमण करणार आहे. *सदर ज्योती कलश यात्रेचे आयोजन शहरात दिनांक 13 जुलै रोजी करण्यात आले होते पार्श्वनाथ भवन मध्ये गायत्री मंत्राचा उच्चार करत पंचकुंडी यज्ञ सोबतच दीप यज्ञ व सत्सग चे आयोजन सोबत विद्या आरंभ संस्कार, गर्भसंस्कार, अन्नप्राशन संस्कार करण्यात आले.
सुख शांती व संघटन शक्ती साठी पंचकुंडिय यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. मानवा मध्ये सनातन धर्मविशयी जागृती निर्माण व्हावी हा यज्ञ करण्यामागचा उद्देश असल्याचे गायत्री परिवाराचे हरिद्वार येथील निस्सीम भक्त हरीश व्यास यांनी सांगून मांवमधील देव जागृत करण्यासाठी व या पृथ्वीवर स्वर्ग आणण्यासाठी या यज्ञाच्या माध्यमातुन प्रार्थना करण्यात आली. भगवती देवी शर्मा यांच्या शताब्दी वर्ष निमित्ताने पंडीत श्री राम शर्मा आचार्य यांच्या संकलपनेतून*अखंड ज्योत कलश* यात्रा चे संपूर्ण विश्वात याचे आयोजन करण्यात आले आहे. देऊळगाव राजा शहरातील जनतेच्या सुख समृध्दी व व्यापार वृध्दींगत होण्यासाठी गायत्री परिवाराचे वतीने या यज्ञाचे माध्यमातुन परमेश्वराकडे मागणी करण्यात आली. सायंकाळीं हजारो दीप वेद मंत्र च्या उच्चारात प्रज्वलन करण्यात आले.
सदर सर्व धार्मिक कार्यक्रम यशस्वितेसाठी गायत्री परिवाराचे रामेश्र्वर गुप्ता, गोपाल व्यास, मनिष काबरा, डॉ. भगवान तोष्णीवाल, अनिल गुप्ता, विनोद धन्नावत, लाहोरे सर, राजकुमार काबरा, यांनी प्रयत्न केले.