ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऐकावे ते नवलच ; शेळ्यांनाही आता रेनकोट 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यात होणारा पाऊस, वारा आणि थंडी यामुळे प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. विशेषतः छोट्या प्राण्यांना त्याचा जास्त त्रास होतो.त्यामुळे पाऊस आणि थंडीपासून शेळ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी तालुक्यातील गुडसेला येथील सुशिक्षित शेतकरी प्रशांत मोरे या तरुण शेतकन्यांने वेगळीच शक्कल लढवली आहे. खताच्या प्लॅस्टिकच्या गोण्यांचा वापर करून शेळ्या पावसात भिजू नये आणि थंडी बाजू नये म्हणून रेनकोट तयार केला आहे.

तालुक्यात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेळीपालन करणारे शेतकरी आहेत. पावसाळ्यात प्रचंड थंडी आणि वारा मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणावर शेळ्या मरण पावतात. थंडी आणि पावसापासून बचाव होण्यासाठी शेळ्यांच्या पाठीवर खतांच्या मोकळ्या गोण्या धुवून स्वच्छ केल्यानंतर त्यापासून बनवलेले रेनकोट प्रत्येक शेळीला बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेळ्यांचे पावसात ओले होण्याचे प्रमाण कमी होते, शिवाय थंडीसुद्धा जाणवत नाही.

शेतीला बकरी पालनाची जोड प्रशांत मोरे हे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून तीन वर्षापासून बकरी पालनाचा व्यवसाय करीत आहे. शेतकऱ्यांनी केवळ कापूस, ज्वारी, सोयाबीन या पिकांवर अवलंबून न राहता बकरी पालनासारखा व्यवसाय करावा. यातूनही उत्पन्न चांगले मिळते, असे त्यांचे म्हणणे आहे.

जिवती तालुका हा जंगलव्याप्त भाग आहे. बकरी पालन व्यवसायाला मोठी संधी आहे. ज्या बकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्न मिळते त्यांना अल्प खर्चात पावसापासून सुरक्षित ठेवणे कर्तव्य आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

रेनकोटांचे विविध रंग कमालीचे उठून दिसत आहेत 

      सध्या या रेनकोटमुळे पावसाचे पाणी व गारठ्यापासून शेळ्यांचा बचाव होतो. रंगीबेरंगी रेनकोट घातलेले शेळ्यांचे कळप पहाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. हिरव्यागार गवताच्या गालीच्यावर या रेनकोटांचे विविध रंग कमालीचे उठून दिसत आहेत. ही कल्पना पाहून अनेक शेळी पाळणाऱ्यांनी आता अशा कल्पना आमलात आणाव्यात.

– प्रशांत मोरे, युवा शेतकरी गुडसेला

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये