ब्रम्हपुरी पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या
गुन्हे शोध पथकाची उल्लेखनिय कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार कर्तव्यावर हजर असतांना, दिनांक २० ऑक्टोंबर २०२५ सोमवारला ब्रम्हपुरी शहरातील कुर्झा वार्ड येथील एक इसम हा आपले राहते घरी अवैध रित्या अंमली पदार्थ (गांजा) साठवून ठेवल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. त्यावर कार्यवाही करीता डिबी पथकातील अधिकारी व पोलीस स्टॉफ तसेच शासकीय दोन पंच यांचेसह शहरातील कुर्झा वार्ड क्र. १ येथे राहणारे विनायक चोले यांचे घराबाबत माहिती घेतली. त्यांचे घराची झडती घेतली असता, त्याचे घरातील नंदी बैलाचे खालचे ड्राप मध्ये एका कापडी थैलीत १ किलो ९६६ ग्रॅम वजनाचा गुंगीकारक वनस्पती अंमली पदार्थ (गांजा) मिळून आला. सदर अंमली पदार्थ (गांजा) दोन शासकीय पंचासमक्ष जप्त करण्यात आला. सदर आरोपी विरुध्द कलम ८ (क), २० (ब), ii (ब) एन.डी.पी.एस. ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. अवैध रित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात ब्रह्मपुरी पोलिसांना यश आले आहे.
गुन्हेगारीवर प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधिक्षक चंद्रपुर मुम्मका सुदर्शन, भा.पो.से., इश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, राकेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली व प्रमोद बानबले पोलीस निरीक्षक पो.स्टे ब्रम्हपुरी यांचे देखरेख व नियंत्रणाखाली ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथील सपोनि मनोज खडसे, पोउपनि बालाजी चव्हाण, पोहवा योगेश शिवणकर, पोहवा अजय कटाईत, पोहवा मुकेश गजबे, पोअं स्वप्नील पळसपगार, पोअं स्वप्नील पळसपगार, पोअं इर्शाद खान, पोअं चंदु कुलसंगे यांनी मिळून सदरची कामगिरी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि बालाजी चव्हाण, पो.स्टे ब्रम्हपुरी हे करीत आहेत.