ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिला संस्कार कलश तर्फे वृद्धाश्रमात दिवाळी साजरी

प्रकाश, प्रेम आणि माणुसकीचा उत्सव

चांदा ब्लास्ट

समाजसेवेचा वसा जोपासणाऱ्या ‘महिला संस्कार कलश ‘या संस्थेतर्फे यंदा दिवाळीचा आनंद एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने डेबुसावली वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा सौ. उषाताई बुक्कावार,सचिव सौ. रचिता रेगुंडवार यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम पार पडला.

या निमित्ताने संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत दिवाळीचा उत्सव साजरा केला. प्रेमपूर्वक फराळाचे वाटप करण्यात आले, दिव्यांच्या प्रकाशाने आणि हसऱ्या चेहऱ्यांनी आश्रम उजळून निघाला. वृद्धांच्या डोळ्यांत दाटलेले आनंदाश्रू आणि चेहऱ्यांवर उमटलेले समाधान हेच या दिवाळीचे खरे सौंदर्य ठरले.

संस्थेने “आनंद वाटल्यानेच वाढतो” हा माणुसकीचा संदेश या उपक्रमातून समाजासमोर ठेवला. महिला संस्कार कलश संस्थेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, सामाजिक जाणिवेला उजाळा देणारा हा उपक्रम प्रेरणादायी आहे.गेल्या पाच सहा वर्षापासन हा ऊपक्रम त्या सातत़्याने घेत आहेत.एवढीच त्यांची अपेक्षा ऐवढेच त्यांना हवे ज्या घरी अंधार आहे त्या घरी उजळो दिवे.या कार्यक्रमा करीता कल्पनाताई पलिकोंडावार तसेच सुनिता पराते, निधी निले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी अनेक महिला संस्कार कलश सदस्यांनी वृध्दांशी संवाद साधत त्यांचा आनंद व्दिगुणित केला.याप्रसंगी महिला संस्कार कलश च्या सदस्यांनी आर्थिक हातभार लावला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये