चिराई भवानी माता महाकाली देवी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ तालुक्यातील चिरादेवी एक छोटेसे गाव या पूर्वापार आख्यायिकेनुसार गावची ग्रामदेवता चिराई देवीचे या गावालगत वेशीवर जंगलात प्राचिन देऊळ होते. गावात सुख शांती, आरोग्य व गावाचे रक्षण देवी करीत असल्याची श्रध्दा आजही जपल्या जाते.
मात्र काळाच्या ओघात मंदिर नामशेष होऊन फक्त अवशेष उरले होते.
ज्या चिराई भवानी माता महाकाली च्या नावावरून गावाचे नाव चिरादेवी पडले त्या आदिशक्तीचे जुन्या मूळ ठिकाणी मंदिर असावे असा संकल्प करीत ग्रामस्थानी मंदिर बांधले आणि दिनांक १२ रोजी मोठ्या भक्तिभावाने विधिवत पूजन करून देवी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पाडला. यावेळी संपूर्ण गावाने शेती अथवा तत्सम कामांना सुट्टी देत प्रचंड उत्साहात मोठ्या भक्तिभावाने हिरहिरीने स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदविला.
दिनांक ११ रोज बुधवारी ग्रामसाफाई, भजन, दिनांक १२ रोजी गावातून मूर्तीची भव्य शोभायात्रा काढून निश्चित मुहूर्तावर विधिवत पूजन करून आगळे ताई यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गोपाल काला, व कीर्तनानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी अध्यक्ष विनोद उपरे, सचिव प्रदीप देवतळे सर्व पदाधिकारी
तथा समस्त धर्मनिरपेक्ष चिरादेवी ग्रामस्थांनी हा सोहळा संपन्न करण्यात विशेष सहकार्य केले.



