ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोटारसायकल चोरीचे गुन्हयात आरोपीस केली अटक

पोलीस स्टेशन वर्धा शहरचे गुन्हे प्रगटीकरण पथकाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

तकारदार नामे कुलविंदरसिंग संतोषसिंग भादा रा. सिख बेडा सावंगी मेघे यांनी दिनांक ३०/०१/२०२६ रोजी त्यांचे मालकीची हिरोहोंडा स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम.एच.३२/बि.बि. /०३४६ किंमत ६०,०००/- रू असलेली मोटारसायकल घेवुन गणराज लायब्ररी यु आर्ट कॉलेज समोर, यशवंत कॉलनी वर्धा येथे मोटारसायकल उभी करून अभ्यास करण्यास गेला. अभ्यास करून परत आला असता त्याला त्याची मोटारसायकल मिळुन आली नाही. त्याने परीसरात भरपुर शोध घेतला व मिळुन नं आल्याने कोणीतरी अज्ञात इसमाने त्याची मोटारसायकल चोरून नेल्याबाबतची तोंडी रिपोर्टवर पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे अप. कमांक ८५/२०२६ कलम ३०३(२) बि.एन.एस. प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

प्रस्तुत गुन्हयाचे तपासामध्ये ठाणेदार श्री. संतोष ताले आणी पोउपनि शदर गायकवाड यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो. हवा. विवेक बनसोड व पथकाने सखोल तपास करून आरोपी नामे रोहीत दिपक दिप वय २६ वर्षे रा. मसाळा यास निष्पण्ण करून त्याचे ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेलेली हिरोहोंडा स्प्लेंडर दुचाकी कमांक एम.एच.३२/बि.बि./०३४६ किंमत ६०,०००/- रू जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

प्रस्तुत कार्यवाही ही मा. श्री. सौरभकुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. सदाशीव वाघमारे अपर पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. प्रमोद मकेश्वर, उप विभागीय पोलीस अधीकारी वर्धा, श्री. संतोष ताले पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वर्धा शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.उप.नि. शरद गायकवाड, विवेक बनसोड, लोभेश गाढवे, शिवदास डोईफोडे आणी महेन्द्र डेकाटे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये