गॅस सिलेंडर दरवाढीचा ब्रम्हपूरीत काॅंग्रेसने नोंदवला निषेध
मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने दिले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- शासनाने गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अचानकपणे फार मोठी वाढ केलेली असून गॅस सिलेंडरच्या नोंदणीचा कालावधी सुद्धा वाढविला आहे. याचा विपरीत परिणाम राज्यातील प्रत्येक कुटुंबावर होणार आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या शासनाने मोठ्या प्रमाणात गॅस दरवाढ करून जनतेचा विश्वासघात केला आहे. या विरुद्ध ब्रम्हपूरीत काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष हितेंद्र राऊत, कृउबा सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, नगराध्यक्ष योगेश मिसार, न.प.उपाध्यक्ष डॉ.नितीन उराडे, चिमुर विधानसभा अंतर्गत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नेताजी मेश्राम, न.प.नियोजन सभापती सचिन राऊत, न.प.पाणीपुरवठा सभापती सतीश हुमने, न.प.आरोग्य सभापती मनोज कावळे, नगरसेवक मोंटु पिलारे, नगरसेवक राकेश पडोळे, नगरसेवक चंद्रकांत बावनकुळे, नगरसेवक वकार खान, नगरसेवक पुष्पाकर बांगरे, महीला काँग्रेस अध्यक्ष योगिताताई आमले, महीला व बालकल्याण सभापती बबीताताई आमले, नगरसेविका रंजनाताई पीसे, नगरसेविका सपनाताई बल्लारपुरे, नगरसेविका रेणुताई ठेंगरी, नगरसेविका जयश्रीताई कुथे, नगरसेविका गिताताई मेश्राम, नगरसेविका ज्योतीताई राऊत, नगरसेविका रंजनाताई बुराडे, नगरसेविका हेमलता सिंहगडे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, जिल्हा काॅंग्रेस सचिव वासुभाऊ सोंदरकर, जिल्हा काॅंग्रेस सहसचिव गाजी पटेल, दलितमित्र प्रा.डि.के.मेश्राम, तालुका काँग्रेस सरचिटणीस गूरुदेव वाघरे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस रुपेश बानबले, किसान सेल अध्यक्ष वामन मिसार, जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, उपसरपंच संदीप बगमारे, कृउबा संचालक अरुण अलोने, राममोहन ब्राडीया, सेवादल अध्यक्ष जाकीर शेख, सरपंच उमेश धोटे, शहर काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल विखार, कृउबा संचालक केशव भुते, नेताजी पिसे, कृउबा संचालक ब्रम्हदेव दिघोरे, कृउबा संचालक किशोर राऊत, रवी मैंद, राहुल ठेंगरी, रिंकु पठाण, इक्बाल जेसानी, इंजी.अमोल सुकारे, सुधीर शिवरकर, अनमोल राऊत, महीला काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाताई राऊत, महीला काँग्रेस सचिव सुशीलाताई सोंडवले, महीला काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख रश्मी पगाडे, कमलेश मुळे, विलास दाणी, डेनी शेंडे, मुकुंदा राऊत, नितीन निहाटे, तुलचंद शिंगाडे, कृउबा संचालक किशोर बगमारे, गिरीश बुराडे, राहुल नेवारे, विलास मंडपे, नंदू भानारकर, जगदीश कलंत्री, सुरेश वंजारी, गोपी चिंचोळकर यांसह मोठ्या संख्येने काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



