वर्धा पोलीस अधीक्षकांची सायबर पोलीस स्टेशन अधिकारी अंमलदार यांची आढावा बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी आज वर्धा सायबर पोलीस स्टेशनमधील अधिकारी/कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत सायबर गुन्ह्यांच्या तपास प्रक्रियेची प्रगती, आव्हाने आणि भविष्यातील धोरणांवर सविस्तर चर्चा झाली. सायबर फसवणूक प्रकरणांतील तक्रारींचे जलद निराकरण आणि आर्थिक फसवणूक झालेल्या पीडितांची गेलेली रक्कम लवकरात लवकर कशी परत करता येईल हे सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा अॅनालिसिस आणि सायबर लॅब सुविधांचा वापर याचाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांची वाढ रोखण्यासाठी जागरूकता मोहिमा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षकांचे निर्देशपोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम आणि इतर कर्मचाऱ्यांना गुन्ह्यांचा तपास वेगाने पूर्ण करण्याचे आणि अटक कारवाई करण्याचे कडक निर्देश दिले. त्यांनी सांगितले की वर्धा सायबर युनिट सायबर गुन्हे नियंत्रणात कशाप्रकारे अग्रेसर राहील दृष्टीने काम करण्यावर भर दिला. या बैठकीमुळे सायबर पोलिस स्टेशनच्या कामकाजात गती येईल आणि जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित डिजिटल वातावरण मिळेल, या बैठकीत सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या
अशाप्रकारची आढावा बैठक नजीकच्या काळात दर महिन्याला आयोजित केली जाणार



