ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या माणिकगड माईन्स आदिवासी जमीन प्रकरणाची महसूल सचिवाचे अचूक अहवाल सादर करण्याचे निर्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

चंद्रपूर जिल्ह्यातील गेल्या पंधरा वर्षापासून आदिवासी कोलाम समाजाच्या जमिनीचा विवाद संपता संपत नाही अशी परिस्थिती असून पाच शेतकऱ्यांनी महसूल अधिकाऱ्याच्या दालनात विष प्राशन करून संपूर्ण राज्यामध्ये खळबळ बाजून दिली होती मात्र त्यावेळी जिल्हाधिकारी पालकमंत्री पोलीस अधीक्षक यांनी जिल्हा रुग्णालय येथे जाऊन शासन आदिवासीच्या पाठीशी उभ आहे चिंता करण्याची गरज नाही लवकरच प्रश्न सोडवू म्हणून गेल्या सात महिन्यात या प्रकरणाला अ शब्द देखील प्रशासनाकडून उच्चारला गेल्या नाही यामुळे यापूर्वी बॉम्बेझरी येथील कोलाम समाजाची जमिनीची मोजणी करून सीमांकनाचे दगड गाळून देण्यात आले त्या जमिनीवर कंपनीने उत्खनन करून नाला शेत जमिनीतुन वळती करण केला शेतजमीन उध्वस्त करून त्या ठिकाणी जड वाहन वाहतुकीसाठी रस्ता तयार करण्यात आला.

जमिनीची मोजणी झाली शेतकऱ्यांनी रस्त्यावर खड्डा खोदून रस्ता बंद पाडला ती जमीन कुसुंबी माईस जमिनीच्या हद्दीत असताना कंपनीने नेहमी तो मी नव्हे असे म्हणत आमच्या क्षेत्रात जमिनी नाही असा दावा केला होता मात्र भूमी अभिलेख विभागाने सर्वे नंबर 44 45 46 47 48 चुनखडी खाण क्षेत्र सीमेच्या आत शेतजमीन कंपनीच्या ताब्यात आल्याने कंपनीने तो रस्ता आमचा नव्हे सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे जिल्हा परिषद चा आहे असे म्हणून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकरी व आंदोलन कर्त्याचे नेते आबिद अली यांनीरस्ता हा शासकीय होता तर रस्त्याचे बांधकाम प्रधानमंत्री सडक योजनेत मंजूर झाले असताना कंपनीने विभागांना पत्र देऊन प्राप्त झालेल्या निधी वापस करण्यास व बांधकाम का रोखले याचे उत्तर देण्यास मात्र कंपनी हतबल ठरली कंपनीच्या 493 हेक्टर जमिनीची संपूर्ण मोजणी करण्यात यावी नोकारी कुसुंबी बॉम्बेझरी शिवारातील संपूर्ण मोजणी करावी अशी मागणी सातत्याने गेल्या पंधरा वर्षापासून होत असताना व कंपनी स्वतः आम्ही मोजणी खर्च भरून मोजणी करण्यास तयार असल्याचे लेखी पत्र देऊन सुद्धा घुमजाव करीत आहे जिल्हाधिकारी यांच्या दिनांक 29/4/2026 च्या बैठकीच्या निर्देशानुसार कंपनीने मोजणीची फी भरून मोजणी करून घ्यावी असे निर्देश दिले मात्र याबाबत भूमी अभिलेख निरीक्षक यांनी तीन वेळा पत्र देऊन सुद्धा कंपनीने त्या पत्राला केराची टोपली दाखविली ही कंपनीच्या मुजोर व्यवस्थापन कारणीभूत असून प्रशासनाकडून वचक नसल्याने कंपनीचा कारभार फोफावला असल्याने गंभीर परिस्थिती सातत्याने निर्माण होत गेली निष्पाप अज्ञानी आदिवासी कोलामांना दहा गुन्हे दाखल करून जेरीस आणण्याचा नेहमी प्रयत्न झाला मात्र कंपनीच्या अनेक अन्याय अत्याचार होऊन सुद्धा साधी एक कारवाई पोलीस प्रशासनाने कंपनी विरोधात केली नाही अनेक वेळा पाणी रस्ता विज खंडित करून कंपनीने दहशत निर्माण केली सुरक्षारक्षकाकडून मारपिट घटनामहिलांची अवहेलना केल्या गेली तरी त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही आठ ते दहा गावाला जाणारा रस्ता ठिकठिकाणी गेट बसवून बंद करण्यात आला तरी त्यांचा गेट खोलण्यासाठी प्रशासनाला पाच वर्ष वाट बघावी लागली जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याऐवजी सिमेंट कंपनीचे अडचणी सोडवण्यामध्ये धन्यता मानणारा प्रशासन आदिवासींना न्यायची प्रतीक्षा पुन्हा किती काळ करावी लागेल हा कळीचा प्रश्न असून कंपनीने मे 2026 दरम्यान आपल्या सीमा क्षेत्राच्या बाहेर जाऊन 150 हेक्टर जमिनीवर खाजगी महसूल व वन विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा घेऊन सिमेंट खांब व तारेचे कुंपण केले हे अनेक वेळा महसूल प्रशासनाच्या लक्षात आणून व निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले मात्र महसूल प्रशासनाने अनाधिकृत अतिक्रमण हटवण्याकडे डोळे झाक केली आदिवासी शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार राज्याचे महसूल वन सचिव यांनी पत्राची दखल घेत बाबनीय संपूर्ण चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले गिराधिकारी यांच्या ई ऑफिस पत्रानुसार तहसीलदार ज्योती यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीचे गट क्रमांक सर्वे नंबर क्षेत्र सातबारा माणिकगड सिमेंट कंपनीच्या अनधिकृत बांधकाम जागेची पडताळणी मोजणी बाबतची सद्यस्थिती सदर जमिनीवर कंपनीचा बेकायदेशीर ताबा तपासून नियम भंग झाले असल्यास प्रस्तावित कारवाईचा तपशील नमूद करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देऊन तात्काळ माहिती सादर करण्यासाठी सुचित केले यावरून मंडळ अधिकारी नामदेव मेश्राम ग्राम महसूल अधिकारी अनिल पेंदोर ज्योती नन्नवरे व गावातील प्रकल्प बाधित शेतकरी लिंगनडोह येथील पोलीस पाटील नोकरी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उस्थळ पाहणी करून मोका चौकशी अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार आहे.

अशी माहिती ग्राम महसूल अधिकारी यांनी दिली यापूर्वी अनेक वेळा पाहणी करून अहवाल देण्यात आला मात्र प्रशासनाकडून गंभीर दखल घेतल्याने गेल्याने प्रश्न जैसे थे आहे कंपनीचा अनाधिकृत कब्जा वन व खाजगी जमिनीवर कब्जा करून केलेले उत्खनन व अनाधिकृत तारेचे कुंपण हा प्रश्न मौका पाहणी केल्याने व अहवाल दिल्याने सुटणार नसून आमची फार दिवसापासून कंपनीच्या ताब्यात असलेल्या 493 हेक्टर जमिनीची संपूर्ण मोजणी करावी व या आदिवासी कोलामाना न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी बालु सिडाम सोमा आत्राम गणेश कुडमेथे महादेव कुळमेथे रामदास मंगाम भिमा मडावी रामकिसन आत्राम विकास मेश्राम गणेश कुडसंगे उतम पवार उपस्थित होते बघूया शासन काय निर्णय घेते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये