ताज्या घडामोडी

लवकरच चंद्रपूरकरांची मागणी रेल्वे बोर्ड कडून पूर्ण होणार

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्हा रेल्वे सुविधा समितीने तीन दिवसीय आंदोलन मान. शोभाताई फडणवीस यांच्या आश्वासनाने समापन करण्यात आले होते. त्यानंतर वैयक्तिक व पत्रव्यवहारद्वारे विभिन्न रेल्वे अधिकारी व मंत्र्यांसोबत झालेल्या पाठपुराव्यामुळे दिनांक १९ नोव्हेंबरचे मुलाखती बाबत भारतीय रेल्वे मंत्री कडून चर्चेकरिता निमंत्रण भेटल्या वरून माननीय शोभाताई फडणवीस यांच्या नेतृत्वात दामोदरजी मंत्री, नितीनजी गुंतेचा व अनिलजी दीक्षित समित माननीय नामदार अश्विनजी वैष्णव, यांच्यासोबत रेल्वे भवन दिल्ली येथे विस्तारित चर्चा झाली. मंत्री महोदयांनी आपल्या प्रलंबित तीन मागण्या बद्दल परिस्थिती समजून घेऊन बल्लारपूर मुंबई बल्लारपूर पुणे व चांदाफोर्ट हावडा या तीनही गाड्यांचे दैनिक परिचलन चालू करण्याबाबत मौखिक समिती देऊन पंधरा दिवसात दोन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून तिसरी मागणी लवकरच रेल्वे बोर्डशी चर्चा करून पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

 दामोदरजी मंत्री यांनी (६ हजार) लोकांचे सही केलेले मागणी पत्र ४४ व्यावसायिक संघटना यांनी दिलेले समर्थन पत्र पाहूनच का होईना माननीय रेल्वेमंत्री यांनी चंद्रपूर पुणे व चंद्रपूर मुंबई या दैनंदिन रेल्वे गाड्या चालू करण्याचे चांदा फोर्ट हावडा द्वीसाप्ताहिक चालू करण्याची पुष्टी दिली आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये