ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमराई प्रभाग ११ येथील 168 भूस्खलन पीडितांचा विषय नोव्हेंबरच्या सभेत घ्या – नगर परिषदेला निवेदन 

चांदा ब्लास्ट

घुग्घूस, चंद्रपुर : अमराई प्रभाग ११ येथील भूस्खलनामुळे बाधित झालेल्या 168 पीडित कुटुंबांचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून, सदर विषय नगर परिषदेच्या नोव्हेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन नगर परिषदेच्या मा. अध्यक्ष मॅडम व मुख्याधिकारी साहेब यांना देण्यात आले.

भूस्खलन होऊन बराच कालावधी उलटूनही पीडित कुटुंबांना अद्याप पूर्ण नुकसान भरपाई, तात्पुरता निवारा व पुनर्वसनाची सोय मिळालेली नाही. त्यामुळे पीडित कुटुंबे मोठ्या अडचणीत जीवन जगत आहेत.

 निवेदनातील प्रमुख मागण्या :

 168 पीडित कुटुंबांचे नव्याने सर्वेक्षण करून अधिकृत यादी प्रसिद्ध करावी. पीडितांना तात्काळ आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी. तात्पुरता निवारा/भाडे अनुदानाची व्यवस्था करावी. कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जागा व घरकुल योजनेचा लाभ द्यावा. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नगर परिषदेमार्फत शिफारस पत्र पाठवावे.

सदर विषय 168 कुटुंबांच्या जीविताशी संबंधित असल्याने, तो सभेच्या अजेंड्यामध्ये प्राधान्याने समाविष्ट करून त्यावर ठराव पारित करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

जर या सभेत विषय घेतला नाही तर पीडित कुटुंबांसोबत पुढील आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये