ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुभक्त परिवाराचे वतीने श्री चिंतामणी बाबांच्या दरबारात मिठाईचे वाटप 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 अखंड भारतात दिगंबर जैन समाजाचे अतिशय तीर्थक्षेत्र व महाराष्ट्रातील जैनांची काशी म्हणून सर्व दूर ओळख निर्माण असलेल्या मराठवाड्यातील श्री चिंतामणी पाश्वनाथ भगवंत यांचे कचनेर येथे अतिशय तीर्थक्षेत्र आहे,येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी कार्तिक पौर्णिमा निमित्ताने मोठी यात्रा भरलेली होती या दिवशी सकाळपासून बाबांच्या चरणी लाखो भाविकांनी नतमस्तक होऊन श्री चिंतामणी पार्श्वनाथ भगवंताचे दर्शन घेतले भक्तांच्या उपस्थितीत भव्य दिव्य असा पंचामृत अभिषेक करण्यात आला या धार्मिक यात्रेत सहभागी भक्तांना देऊळगाव राजा येथील गुरुभक्त परिवाराच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले गुरुभक्त परिवाराच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून कचनेर येथे नित्यनेमाने कार्तिक पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर भाविकांना मिठाईचे वाटप करन्यात येत असते त्यांच्या या दानशूर वृत्तीचे सर्व समाजात विशेष कौतुक होत आहे यावेळी गुरुभक्त परिवाराचे नंदन मिश्रीकोटकर, जितेंद्र गिरीसा,ऋषभ महाजन,राजेश खंडारे, रोहित अक्करबोटे, दिलीप महाजन,संजय अक्करबोटे, पियुष खडकपूरकर राजेंद्र गिरीसा, अभिजीत खवडे विशाल रायबागकर उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये