ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री बालाजी संस्थान कार्यालयात लक्ष्मी पूजन व सरस्वती पूजन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

श्री बालाजी संस्थान कार्यालयात मुहूर्ताप्रमाणे 21 ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वाजता लक्ष्मीपूजन करण्यात आले. वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, धर्माधिकारी श्री टाकळकर तसेच व्यवस्थापक श्री बिडकर यांच्या हस्ते श्री बालाजी महाराजांच्या सर्व ऐतिहासिक दागिन्यांचे विधिवत पूजन होऊन आरती झाली. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर संस्थानने श्री बालाजी मंदिराची फुलांनी आकर्षक सजावट केली व फटाक्यांची आतषबाजी झाली.

दि. २२ ऑक्टोबर रोजी दीपावली पाडव्याच्या दिवशी मुहुर्ताप्रमाणे सकाळी ९ वाजता संस्थान कार्यालयात सरस्वती पूजन झाले. वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, श्री टाकळकर व व्यवस्थापक श्री बीडकर यांच्या हस्ते संस्थानचे खातेबुक व पंचांगाचे विधीवत पूजन होऊन आरती झाली. त्यानंतर ब्रम्हवृंदांनी पंचांग वाचन केले.

दोन्ही कार्यक्रमास युवराज रोहन राजे जाधव, सर्व क्षेत्रउपाध्ये, सर्व देवउपाध्ये, त्रैशाखीय ब्राह्मणवृंद तसेच संस्थानचे कर्मचारी व प्रसिद्धी प्रमुख श्री सुरज गुप्ता उपस्थित होते.

पाडव्याच्या मुहूर्तावर माळी समाजाने मंडपोत्सवाच्या लाकडी लाटा संस्थानच्या बळदात भक्तीभावाने वर्षभरासाठी ठेवून दिल्या. संस्थानतर्फे त्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला व पुजाऱ्यामार्फत त्यांना खोबरे प्रसाद वाटप करण्यात आला. पाडव्याच्या मुहूर्तावर भक्त व व्यापारी वर्गाला कानगी देण्यासाठी संस्थानने २ काऊंटरची व्यवस्था केली होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये