ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेसकडून चंद्रपूर महानगरपालिकेसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले

परिवर्तन घडवू इच्छिणाऱ्या नवतरुण-तरुणींना संधी ; १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट

आगामी होऊ घातलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या (स्थानिक स्वराज्य संस्था) पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाने तयारीला सुरुवात केली आहे. पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मुलाखत प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असून, 1 ते 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.

काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची लवकरच मुलाखत प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. २४ ऑक्टोबरपासून शहर (जिल्हा) काँग्रेस कार्यालय, तिवारी भवन कस्तुरबा चौक चंद्रपूर येथे अर्ज उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे अर्ज करणाऱ्या इच्छुकांनी अर्जासोबत आपली संपूर्ण आणि अचूक माहिती देणे अनिवार्य आहे. या माहितीमध्ये खालील बाबींचा समावेश असावा. उमेदवाराचे संपूर्ण नाव, प्रभागाचा पत्ता, मागील निवडणूक अनुभव, यापूर्वी कोणती निवडणूक लढवली आहे? यापूर्वी महानगरपालिका किंवा पूर्वीच्या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेले आहे काय? आरक्षण प्रवर्ग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग) याची माहिती द्यावी. सद्यस्थिती आणि सामाजिक कार्य कोणते, आतापर्यंत केलेली सामाजिक कामे तसेच प्रभागातील प्रमुख स्थानिक मुद्द्यांची माहिती देणे आवश्यक आहे.

काँग्रेस विचारधारेच्या आणि परिवर्तन घडवू इच्छिणाऱ्या नवतरुण-तरुणींनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे विशेष आवाहन चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी केले आहे. पक्षनिष्ठ, सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि प्रतिष्ठित नागरिकांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 1 ते 10 नोव्हेंबरपर्यंत चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी कार्यालय, कस्तुरबा (गिरनार) चौक येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये