ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथील समाज मंदिराच्या वादाबाबत नगर परिषदने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडले 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराच्या समोर दिलेली बांधकाम परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी 10 मार्च पासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर दुसऱ्या दिवशी नगर परिषद चे मुख्याधिकारी अरुण मोकळ व नगराध्यक्षा माधुरी शिपणे यांच्या मध्यस्थीने व लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडले.

नगर परिषद ने समाज मंदिराच्या जागेवर देण्यात आलेली बांधकाम परवानगी रद्द करण्याची तसेच नगर परिषद च्या जागेचे मोजमाप करून जागा निश्चित करण्यात येईल, त्यानंतर नगर परिषद च्या जागेवर कोणालाही बांधकाम करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नसल्याचे सांगितले.

यावेळी मुख्याधिकारी अरुण मोकळ, तुषार शिपणे, पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी, डॉ रामप्रसाद शेळके, अतिश कासारे, गणेश सवडे , नगरसेवक विष्णु झोरे, ॲड रमेश घेवंदे, गजानन पवार, सुनील शेजुळकर, गौतम कासारे, उपोषण कर्ते, तसेच इतर नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये