नागपूरात पहिल्यांदा बंजारा लेंगी महोत्सव संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बंजारा समाजाच्या रितीरीवाजा प्रमाणे जगदंबा देवीची पूजा व आराधना हजारो वर्षापासून अत्यंत श्रद्धा व भक्तीभावाने साजरा करण्यात येतो.बंजारा समाजाचे खास वैशिष्ठ्य म्हणजे आपली स्वतंत्र जीवनशैली,खानपान,चालीरीती,भाषा,वेषभुषा,लग्नविधी,सण समारंभ साजरा करण्याची अनोखी शैली प्रचलित आहे.दिवाळी आणि होळी महोत्सव हे तर आगळे वेगळेच आहे.अलीकडे बंजारा समाज मोठया प्रमाणात शहरात शिक्षण,नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेला आहे.
बंजारा समाज निसर्गावर व आपल्या विशेष संस्कृतीवर जीवापाड प्रेम करतो.शहरीकरणाच्या आणि संगणक क्रांतीच्या युगातही नागपूर सारख्या मेट्रो शहरात नागपूर च्या खरबीचे नायक श्री पिरुसिंग राठोड यांच्या संकल्पनेतून शहरात पहिल्यांदाच नुकताच भव्य लेंगी महोत्सव आणि जगदंबा देवीच्या महापूजेचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अकोला जिल्ह्यातील सुसंस्कृत आणि उच्चविद्याविभूषित डॉ.विजय जाधव आणि महिला व पुरुष चमूने पारंपारीक वेषभूषेत अत्यंत उत्साहाने लेंगी महोत्सव सादरीकरणातून बंजारा संस्कृतीचा अनोखा पैलू सर्वासमोर सादर केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पारशिवणीचे क्रियाशिल संवर्ग विकास अधिकारी श्री.सुभाष जाधव यांनी खास बंजारा शैलीत सादर केले.नागापूर नगरीचे नायक इंजि.आत्माराम चव्हाण व कारभारी अॅड. बद्रीप्रसाद चव्हाण त्याचप्रमाणे नागपूर शहरातील हजारो बंजारा बांधव,महिला भगिनी आणि बालगोपालांचा सहभाग होता.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक खरबी टीम तसेच नागपुरातून श्री इंजी प्रविण पवार, सुभाष जाधव,श्री श्रीकांत राठोड, प्रेम आडे, श्री मनोहर जाधव,पंजाब जाधव,अशोक पवार,शरद पवार, अजय राठोड,विनोद जाधव,श्रीपत राठोड,माणिक जाधव,नीरज राठोड, चंद्रशेखर चव्हाण,भीमराव राठोड, संजय राठोड,भोजराज राठोड, मंगल राठोड,पूनम राठोड,दशरथ राठोड,अविनाश जाधव,अविनाश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.



