ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती बसस्थानक परिसरातील बेशिस्त ऑटोचालकांवर कारवाईची करा

शिवसेनेचे युवा लोकसभा सचिव सुरज शाहा यांची निवेदनाद्वारे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :- नागपूर–चंद्रपूर महामार्गालगत असलेल्या भद्रावती बसस्थानक परिसरात ऑटोचालकांकडून अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात ऑटो स्टँडवरच ऑटो उभे करण्याच्या सूचना देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटोचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे युवा लोकसभा सचिव तथा चंद्रपूर-वरोरा-बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे प्रमुख सुरज गो. शाहा यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी आरटीओ कार्यालय, चंद्रपूर तसेच भद्रावती पोलिस ठाण्याला निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, भद्रावती बसस्थानक परिसरात ऑटो स्टँड तयार करण्यात आले असून, त्याचे बांधकाम नगरपरिषद भद्रावतीच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, अनेक ऑटोचालक ऑटो स्टँडबाहेर अस्ताव्यस्तपणे वाहने उभी करून प्रवाशांना घेण्यासाठी रस्त्यावरच थांबतात. परिणामी रहदारीस अडथळा निर्माण होऊन अपघातांची शक्यता वाढली आहे.

प्रवाशांना घेण्यासाठी रस्त्यावर विविध ठिकाणी ऑटो उभे राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होत असून, संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विना परमिट, फिटनेस व इन्शुरन्सच्या ऑटोवरही कारवाईची मागण भद्रावती हे औद्योगिक शहर असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा असते. शाळकरी विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकही ऑटोसेवेचा वापर करतात. मात्र, काही ऑटो विना परमिट, विना फिटनेस प्रमाणपत्र तसेच विना इन्शुरन्स चालविले जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

अशा वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटोचालकांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, तसेच बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ऑटोचालकांना निश्चित केलेल्या स्टँडवरच वाहने उभी करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी सुरज गो. शाहा यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये