ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देऊळगाव राजा येथे जागतिक विणकर दिन साजरा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथे सकल विणकर समाजाच्या वतीने जागतिक विणकर दिवस 7 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला.
अहिंसा मार्गावरील श्री चौंढेश्वरी मंदिर चौक येथे विणकर पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून पूजन करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी हातमाग उद्योग चे महत्त्व, विणकर समाजाचे देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासात असलेले योगदान, आणि आधुनिक काळात हातमाग उद्योगा समोरील आव्हाने यावर विचार मांडले, यावेळी विणकर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता,



