कान्हाळगाव ते चेन्नई माडवा रस्त्याची दुर्व्यवस्था
विनोद जुमडे यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा तालुक्यातील कान्हाळगाव चन्नई मांडवा रस्त्याची मागील अनेक वर्षापासून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे त्यामुळे येणाऱ्या शाळकरी मुलांना तसेच कोरपना तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे खरेदी विक्री करण्याकरिता व शासकीय कामाकरिता येत जात असताना नागरिकांना सुद्धा नाहक त्रास सहन करावे लागत आहे तसेच माडवा येते पी एस सी असल्यामुळे खेड्यापाड्यातील नागरिक दवाखान्यात जात असतात व डिलिव्हरी साठी नेत त्यांना महिलांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.
तरी संबंधित विभागांनी गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर रोडची मंजुरी करून रोडचे काम करावे व राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे यांनी गांभीर्याने लक्ष देऊन रोडचे पूर्ण काम करावे अशी मागणी विनोद जुमडे यांनी केली जर रोडची मंजुरी लवकरात लवकर न झाल्यास गावकरी नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला



