राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त नीळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ए. बी. धोटे, प्राचार्य, गुरुनानक महाविद्यालय, बल्लारपूर, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अजय दहेगावकर व डॉ. प्रविण कुमार नासरे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आलेत्यानंतर कार्यक्रमाची भूमिका प्राध्यापक डॉक्टर कुलदीप भोंगळे समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना यांनी आपल्या प्रस्ताविकेतुन स्पष्ट केली. यानंतर प्रमुख अतिथी डॉ. ए. बी. धोटे यांनी राष्ट्रीय सेवा योजना चे महत्त्व, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना ची भूमिका तसेच समाजसेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना ची स्थापना व विकास, NSS च्या माध्यमातून समाजासाठी करण्यात येणारी विविध कार्ये आणि सामाजिक जबाबदारी याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा तसेच शैक्षणिक क्षेत्रात मेरिटमध्ये येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
या कार्यक्रमांमध्ये राज्य शासन आणि विद्यापीठ यांच्या पत्रकारानुसार Viksit Bharat Young Leaders Dialogue (VBYLD-2027) Quiz मध्ये सहभागी होण्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आली आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सूचना पीपीटी प्रेसेंटेशन द्वारे सांगण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कुलदीप भोंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन लेफ्टनंट डॉ सचिन श्रीरामे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.



