ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांनी पांढरकवडा शिवारात प्रोरेड करून मोहाचा 1 लाख 10 हजाराचा मुद्देमाल नष्ट
एम. ए. शेख निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली केली कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 24/10/2026 रोजी पहाटे 5 ते 5,30 वाजता दरम्यान पांढरकवडा पारधीबेडा शिवारात जाऊन प्रोरेड करून 1,10,000/- रुपयांचा दारुचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला सदरची हि कारवाई संजय पाटील अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली एम. ए. शेख निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांच्या नेतृत्वाखाली डि. वाय. राऊत दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा आर. यु. काष्टे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा येथील कर्मचारी अमित नागमोते गिरीश बावणे कुमारी सुजाता भारस्करे व वाहन चालक योगेश गांवडे यांनी केलेली आहे



