ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्याहस्ते अवयवदान जनजागृती रॅलीचा शुभारंभ

सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजन ; विद्यार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : अवयवदानाची जनजागृती करण्यासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयातून जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कुश मोटवाणी, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, निवासी उपजिल्हाधिकारी राजू रणवीर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजसिंह पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नलिनी विखे, सामान्य रुग्णालयातील बाह्य संपर्क अधिकारी डॉ.विद्या पवार, नेत्र समुपदेशक प्रफुल्ल काकडे आदी उपस्थित होते.

मृत्यूनंतर अवयवांचे दान केल्यास अनेक गरजूंना ते उपयोगी पडू शकतात. मागणीच्या तुलनेत अवयव कमी उपलब्ध होत असल्याने प्रत्येक गरजू व्यक्तीस अवयव उपलब्ध होत नाही. सामाजिक भावनेतून अवयवदान केल्यास मृत्यूनंतर अनेकांच्या आयुष्यात बदल घडविण्यासोबतच त्यांचे जीवन आनंददायी करण्याचे पुण्य अवयवदानकर्त्यास प्राप्त होऊ शकते. त्यामुळे अवयवदानाची जनजागृती करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

‘अवयवदान श्रेष्ठ दान’, ‘नेत्रदान श्रेष्ठ दान’, ‘अवयवदान करा मानवतेची सेवा करा’, अशा घोषणा देत व हातात जनजागृती फलक घेत विद्यार्थ्यांनी अवयवदान व नेत्रदानाची जनजागृती केली. जनजागृती रॅलीत शासकीय नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थीनी तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये